🌟परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे एकुण 60.09 टक्के मतदान ?


🌟मागील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मतदान टक्केवारीत ०३.१० इतकी घट🌟 

 🌟असंख्य मतदारांपर्यंत पोलचिठ्या पोहोचल्याच नाही : प्रशासन चौकशी करणार काय ? 🌟

परभणी (दि. 26 एप्रिल)परभणी लोकसभा मतदार संघात मागील सन २०१४ व २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या परभणी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घटली असून यास संपूर्णतः स्थानिक पातळीवरील प्रशासन जवाबदार असून अनेक विधानसभा मतदारसंघात बिएलओं कडून पोचिठ्ठ्यांचे वाटपच करण्यात आले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे परभणी लोकसभा मतदारसंघात सन 2014 मध्ये 64.2 टक्के इतकं मतदान झाले होते. तर सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 63.19 टक्के मतदानाची नोंद झाली परंतु दोन्ही लोकसभा मतदारसंघा निवडणूकांच्या तुलनेत या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी काल शुक्रवार दि.26 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार जरी पडले असले तरी परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे  सरासरी एकूण अंदाजे 60.09 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली असून यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याऐवजी घट का झाली या संदर्भात प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 290 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये 95-जिंतूर विधानसभा मतदार संघात 55.17 टक्के तर 96-परभणी 60.07 टक्के, 97-गंगाखेड 62.02 टक्के, 98-पाथरी 63.44 टक्के, 99-परतुर 59.42 टक्के आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 60.09 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन, परभणी लोकसभा मतदार संघात सरासरी अंदाजे एकुण 60.09 टक्के मतदान झाले आहे.

परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँग रुम्समध्ये सुरक्षीतरित्या आणण्यात आल्या आहेत. आलेली सर्व मतदान यंत्रे आयोगाचे निरिक्षक, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सिल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.....

**

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या