🌟जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आदेश जारी🌟
परभणी (दि.22 एप्रिल) : भारत निवडणूक आयोगाने दि.16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असुन, कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने, जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मतदानाच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.
मतदान केंद्राच्या ठिकाणापासुन 200 मिटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/ उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे उमेदवाराचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्हादंडाधिकारी परभणी रघुनाथ गावडे यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात मतदान केंद्राच्या ठिकाणी 200 मिटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे/उमेदवाराचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
निवडणूकीची कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन दि. 25 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 08.00 वाजे पासून ते दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत आदेश लागू असल्याचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेशात नमूद केले आहे......
****
0 टिप्पण्या