🌟वाशिम शहरात महामानवांच्या जयंतीनिमित्त 133 प्रतिमेचे वितरण....!


🌟सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांचा पुढाकार🌟

फुलचंद भगत

वाशिम : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तरुण क्रांती मंच व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त स्थानिक आंबेडकर चौक येथे चळवळीतील समाजसेवक समवेत विविध सर्वधर्मीयांना महामानवांच्या प्रतिमांचे वितरण केले. गत वर्षीही हा उपक्रम निलेश सोमाणी यांनी राबविला होता.

स्थानिक आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमामध्ये जेष्ठ समाजसेवक गोपाळराव आटोटे गुरुजी,शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विजय मनवर, अनंतकुमार जुमडे, शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रज्ञानंद भगत, अशोक खिराडे, रवि सपकाळ, धम्मपाल पाईकराव, अरविंद उचित, जेष्ठ कलावंत शेषराव मेश्राम, बार्टीच्या समन्वयक वैशालीताई, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, रा.कॉं. चे जेष्ठ नेते पांडूरंग ठाकरे, शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष शंकर वानखेडे, प्राचार्य प्रशांत गडेकर, सामाजीक कार्यकर्ते संजीव भांदुर्गे समवेत अनेकांना महामानवांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी सोमाणी यांच्या उपक्रमाचे स्वागत केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज प्रत्येक समाजातील महिला, पुरुष व प्रत्येकांना अधिकार मिळालेले आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता याची शिकवण त्यांनी समाजाला दिल्याचे प्रतिपादन सोमाणी यांनी यावेळी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या