🌟परभणी जिल्ह्यात समता पंधरवड्याचे 10 ते 15 एप्रिल कालावधीत आयोजन....!


🌟या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले🌟 


परभणी (दि.10 एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या आरक्षित जागेवर अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याने या प्रवर्गातील 11 वी, 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना समितीकडे वेळेत अर्ज सादर कराता यावा व विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे दि.10 ते 25 एप्रिल, 2024 या कालावधीमध्ये समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या समता पंधरवड्यात इयता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सन 2023-24 मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती समानसंधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहे समता पंधरवड्यात सीईटी देणारे विद्यार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज देखील भरण्यात येऊन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी समानसंधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.

समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व  विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या