🌟पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल घोटाळा लोकसभेत : तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश...!

 


🌟रेल्वे डिझेल डेपोत ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खा.संजय जाधव यांचा आरोप🌟

🌟डिझेल चोरी घटनेतील महत्वाचा आरोपी मुख्य कार्यालय अधिक्षकाच्या जामीनावर ०१ एप्रिल रोजी निर्णय🌟


परभणी/पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) - दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानक रेल्वे कंज्युमर डिपोतून अत्यंत सुनियोजित पद्धतीने मागील जवळपास दिड दशकांपासून रेल्वेच्या डिझेलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असतांना या गंभीर प्रकरणावर सोईस्कररित्या पडदा टाकण्याचे दुष्कृत्य केल्या जात होते याप्रकरणाची उकल दि.२९ जानेवारी २०२४ रोजी परभणी जिल्ह्यातल्या दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाट्यालगत पुर्णा जंक्शन येथील रेल्वे कंज्युमर डिपोतून डिझेल पुरवठा करुन निघालेले डिझेल टँकर क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ हे परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यात जवळपास ५ हजार ५०० लिटर डिझेल साठा आढळून आला तर पुर्णा रेल्वे कंज्युमर डिपोतील कागदपत्रात संदर्भात डिझेल टॅंकर मधील २८ हजार लिटर डिझेल साठा खाली केल्याची नोंद करण्यात आल्याने सदरील प्रकार पुर्णा रेल्वे कंज्युमर डिपोतील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या संगणमतातून कागदपत्रांवर सोईस्करपणे नोंदी घेऊन चोरी होत असल्याचे उघड झाले.

पुर्णा जंक्शन येथील रेल्वे कंज्युमर डिपोतून सोयीस्कररित्या कागदोपत्री नोंदी घेऊन मागील दिड दशकांपासून मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी होत असल्याची जोरदार चर्चा रेल्वे कर्मचारी वर्गातून ऐकावयास मिळत असतांना या घटनेला दि.२९ जानेवारी २०२४ रोजी प्रत्यक्ष दुजोरा मिळाला तत्पूर्वी याच रेल्वे कंज्युमर डिपोतील एका कर्मचाऱ्याच्या गळ्याभोवती डिझेल चोरी प्रकरणात चौकशीचा फास आवळला गेल्याचे व त्याला सतर्कता विभागाने जानेवारी २०२४ या महिन्यात क्लिनचीट दिल्याचे बोलले जात असतांनाच दि.२९ जानेवारी २०२४ रोजी डिझेल महाघोटाळा प्रकरणावरील पडदा उठवण्याचे काम परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याने या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्ह्यातील लोकसभा सदस्य खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी संसदेत शुन्यकाळात प्रश्न उपस्थित कमीत कमी ३०० करोड रुपयांच्या वर डिझेल घोटाळा झाल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देऊन संबंधित घोटाळ्यातील घोटाळेबाजांच्या साखळीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असतांनाच दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे कम्युनिटी हॉलच्या मागील भागातील स्टोअररुम म्हणून वापर होत असलेल्या जुन्या रेल्वे गार्ड/टिसी रनिंगरुमला आग लागून कागदपत्रे जळाल्याची घटना घडली की घडवण्यात आली ? हा प्रश्न अनुत्तरीत असतांनाच रेल्वे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दि.०७ मार्च २०२४ रोजी पुर्णा रेल्वे कंज्युमर डिपोत चोरी झालीच नसल्याचे पत्र जारी करुन या डिझेल घोटाळ्यावर सोईस्करित्या पांघरूण घालण्याचा प्रकार केल्याने या प्रकरणात रेल्वे प्रशासनातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे देखील हात बरबटलेले असल्याचे दिसत आहे.

दरम्यान पुर्णा जंक्शन रेल्वे कंज्युमर डिपोतील डिझेल चोरी प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना सातत्याने हुलकावणी देत असलेला या प्रकरणातील महत्वाचा आरोपी मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याचा जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथून अटकपूर्व जामीन अर्ज दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी फेटाळल्यानंतर तो अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेला सन्माननीय उच्च न्यायालयाने त्याला डिझेल चोरी प्रकरणात तपासकामी सहकार्य करण्याच्या व रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात दि.२८ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२४ रोजी सकाळी १०-०० ते १२-०० वाजेच्या दरम्यान उपस्थित राहून सहकार्य करण्याच्या व साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या अटीवर इंटरीम जामीन दिला होता कायम जामीनावर दि.१८ मार्च २०२४ रोजी निर्णय होणार होता परंतु अर्जदार मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन यांचे वकील प्रकृती अस्वस्थतेमुळे हजर राहू न शकल्याने यावर आता ०१ एप्रिल २०२४ रोजी निर्णय होणार आहे.

पुर्णा जंक्शन रेल्वे कंज्युमर डिपोतील डिझेल चोरी प्रकरणात एकूण ०८ आरोपी ज्यात तिन कार्यालयीन अधिक्षक,एक कर्मचारी यांच्यासह टँकर चालक संदिप पांढरे,नागनाथ शेंडे,टँकर मालक संतोष पवार इंडियन ऑईल पेट्रोल पंप मॅनेजर रामचंद्र यादव आदींचा समावेश असून या प्रकरणातील आरोपी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणे तर सोडाच उलट प्रकरणातील साक्ष पुराव्यांशी देखील छेडछाड करीत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या सुत्रांकडून समजते दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी असतांनाच प्रकरणाचा तपास केवळ दि.२९ जानेवारी २०२४ या दिवशी पकडल्या गेलेल्या ५५०० लिटर डिझेल चोरी प्रकरणा पुरताच मर्यादित ठेवून परभणीचे लोकसभा सदस्य खा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्या संसदेत शुन्यकाळात उपस्थित केलेल्या प्रश्नासह त्यांनी केलेल्या ३०० करोड रुपयांच्या डिझेल घोटाळ्याच्या आरोपांची रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डिझेल चोरी झालीच नाही असे लेखी आदेश जारी करुन खिल्ली उडवीत असल्याचे पाहावयास मिळत आहे......

टिप : अल्पबुध्दीजिवींनी बातमीसह बातमीतील माहितीची कॉफी कद्दापी करु नयें....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या