🌟बारामती मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारीचा बळी द्यावयाचा प्रश्‍नच उद्भवत नाही : निर्णय महायुतीच्या हितासाठी....!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस नेते मा.जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांचे स्पष्टीकरण🌟 

परभणी (दि.३१ मार्च) : परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्षास जागा सोडण्याचा घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीच्या हितासाठीच झाला असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी दिले आहे. 

पुढं बोलतांना राजेश विटेकर म्हणाले की बारामती मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारीचा बळी द्यावयाचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा आमचे आदरणीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणास निवडणूकीच्या दृष्टीने कामास लागण्याचा सल्ला दिला होता परंतु महायुतीतून मित्र पक्षासाठी जागा सोडण्याचा प्रश्‍न उद्भवल्यास परभणीची जागा सुध्दा आपणास घटक पक्षासाठी सोडावी लागेल असे देखील स्पष्ट केले होते. त्यामुळेच ऐनवेळी मित्र पक्षास जागा सोडण्याचा श्रेष्ठींचा निर्णय आपणास शिरसावंद्य आहे नाराजी वगैरेचा प्रश्‍न उद्भवत नाही. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ‘बारामतीसाठी विटेकर यांच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा बळी’ दिल्याचे केलेले वक्तव्य हे फेक अकाऊंट द्वारे केल्या गेले आहे, त्यावर आपला विश्‍वास नाही, असेही विटेकर यांनी नमूद केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांच्या विजयासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करु, अशी ग्वाहीही विटेकर यांनी यावेळी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या