🌟शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय (बंडू) जाधव मंगळवार दि.०२ एप्रिल रोजी शक्तीप्रदर्शन करणार....!


🌟परभणी लोकसभा निवडणूक : महाविकास आघाडीकडून करणार उमेदवारी अर्ज दाखल🌟

परभणी (दि.२९ मार्च) : शिवसेना (उबाठा) गटाचे मा.खासदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव हे मंगळवार दि.०२ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यावेळी ते प्रचंड शक्तीप्रदर्शन करतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

          परभणी लोकसभा मतदारसंघातून जाधव यांना शिवसेनेने (उबाठा) तीसर्‍यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे जाधव यांना विजयाच्या हॅट्रीकची संधी उपलब्ध झाली. त्या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच मोर्चेबांधणी सुरु केली. विशेषतः महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेतेमंडळींबरोबर संयुक्त मेळावा, त्याआधी स्वपक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा दोनवेळा मोठा मेळावा घेवून प्रचाराचे रणशिंग फुंकले.

दरम्यान, मंगळवारी जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्या दृष्टीने जाधव यांनी गेल्या दोन चार दिवसांपासून भक्कम अशी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळींसह पदाधिकार्‍यांना निमंत्रणे पाठविण्यात आली असून मंगळवारी सकाळी 10 वाजता मध्यवस्तीतील शनिवार बाजारातून जाधव हे मिरवणूकीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत. त्या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणावर आघाडीतील सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी व्हावेत, या दृष्टीने ते व्यूहरचना करीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीचे हे शक्तीप्रदर्शन लक्षवेधी ठरावे, या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या