🌟पुर्णेतील बळीराजा साखर कारखान्याच्या बॉयलर मधून निघणाऱ्या काजळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.....!


🌟बळीराजा साखर कारखाना तात्काळ बंद करून ॲश हॅंडलींग सिस्टीम बसवण्याची मागणी🌟 


पुर्णा (दि.२२ मार्च) - पुर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात असलेल्या बळीराजा साखर कारखान्याच्या बॉयलर मधून निघणाऱ्या कार्बन अर्थात काजळीमुळे कानडखेड येथील ग्रामस्थांसह आसपासच्या गावातील नागरिकांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले असून बळीराजा साखर कारखान्याने यावर्षी नव्याने उंची वाढवून लावलेल्या बॉयलर मधून मोठ्या प्रमाणात निघत असलेल्या कार्बन अर्थात काजळीमुळे कानडखेडसह आसपासच्या गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून सदरील कार्बन अर्थात काजळी पुर्णा शहरातील रेल्वे लोहमार्गा पलीकडील अनेक वसाहतींसह शहरातील अण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,भिमनगर,कोळीवाडा,धनगर गल्ली,कुरेशी मोहल्ला आदी भागात देखील हवेतून फैलत असल्यामुळे आदी परिसरातील नागरिकांना तसेच पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी फिरायला जाणाऱ्या व दमा/शुगर/बिपी/हृदयविकारा सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या वयोवृद्ध तसेच महिला शाळा/महाविद्यालयात शिकवणारे विद्यार्थी विद्यार्थीनींना या काळजीचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.


बळीराजा साखर कारखान्याच्या बॉयलर मधून निघणाऱ्या काजळीमुळे जनसामान्यांचे आरोग्यास धोका निर्माण होऊन अनेकांना अस्थमा (दमा),टिबीसह श्वसनाचे विविध गंभीर आजार जडत असल्यामुळे बळीराजा साखर कारखाना तात्काळ बंद करून नवीन ॲश हॅंडलींग सिस्टीम १५ दिवसांच्या आत बसवावी अन्यथा बळीराजा साखर कारखान्याच्या विरोधात परभणी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन निदर्शन करण्यात येतील मागील तक्रार अर्ज देण्यास पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील कारवाई संदर्भात कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार झालेला नाही तरी येत्या २७ मार्च २०२४ पर्यंत दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही तर दि.२८ मार्च २०२४ रोजी परभणी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणस सुरुवात करण्यात येणार असून या उपोषणा दरम्यान जिवीताचे काही बरेवाईट झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जवाबदार राहाल असा इशारा दि.२१ मार्च २०२४ रोजी डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने परभणी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाला देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला असून या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, मिलिंद वाघमारे,राजु गायकवाड,संजय अंबोरे,सचिव वाघमारे, चंद्रकांत चव्हाण आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तहसिलदार माधवराव बोथीकर यांना देण्यात आल्या आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या