🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वंचितचा ठराव पास🌟

* लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला 10 ते 12 जागा तर अजित पवार गटाला 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता

* दिल्लीत दोन दिवसांनी पुन्हा एकदा महायुतीची बैठक होणार बुलढाण्यातुन प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार 

* बुलढाण्याची जागा भाजप लढवणार असल्याचे संकेत व बुलढाणाची उमेदवारी आमदार श्वेताताई महाले किंवा शेतकरी नेते रविकांत तुपकर,युवा नेते संदिप शेळके या पैकी  कोणा एकास मिळण्याची शक्यता*

* अजित पवारांविरोधात हर्षवर्धन पाटलांना बळ देऊनही इंदापुरात सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स हटवला, तसेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली

* भारताचा इंग्लंडवर एक डाव आणि 64 धावांनी विजय, मालिका 4-1 ने जिंकली

* स्वाभिमानी जनता संजय मंडलिकांच्या मागे ठामपणे उभी, त्यांनाच उमेदवारी द्या;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शिंदे गटाची मागणी

* राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचा दावा

* भाजपनं लक्षात ठेवावं आम्ही झुकणारे नाहीत, ईडीच्या कारवाईवरून रोहित पवारांचा हल्लाबोल

* प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, वंचितचा ठराव पास

* सगेसोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा राजकीय सुपडा साफ करु, सरकारला आव्हान देण्यासाठी मनोज जरांगेंची बीडमध्ये 900 एकरात सभा  घेण्याची तयारी

* दहावीचा हिंदीचा पेपर अर्ध्या तासात परीक्षा केंद्राबाहेर, वर्ध्यातील सेलूमध्ये कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या