🌟परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून प्रथमच बहुजन नेतृत्वाला संधी ?


🌟महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी जानकरांना उमेदवारी : अधिकृत उमेदवार की निव्वळ अफवा ? जनसामान्यांचा प्रश्न🌟


परभणी लोकसभा मतदारसंघ मागील जवळपास तीन दशकांपासून स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी भारावलेल्या एकनिष्ठ मतदारांनी उभारलेला अभेद्य बालेकिल्ला आजवर शिवसेना-भाजप युतीला या परभणी लोकसभा मतदारसंघात भरभरून मतदान केले परंतु विकासापासून कायमस्वरूपी वंचित राहिलेल्या या मतदारसंघात मतदारांनी मात्र या अविकसित मतदार संघात प्रत्येक नागरी असुविधांना तोंड देत कायम शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य दिले. शिवसेना दुभंगल्यानंतर प्रथमच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे)-भाजप-रासपा महायुतीकडून सर्वसमावेशक बहुजन नेतृत्व महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवारी मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.


परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून बहुजन नेतृत्व महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जर झाला असेल तर हा निर्णय निश्चितच ऐतिहासिक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी रासपा नेते महादेव जानकरांना यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवले जाईल अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र आता रासपच्या जागे संबंधातील गुप्तता संपल्याचे बोलले जात असल्याने आता विविध चर्चांनाही पुर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रासप नेते महादेव जानकर हे महाराष्ट्रातील आघाडीच्या बहुजन नेत्यांपैकी एक खंबीर नेतृत्व असून त्यांनी सन २००३ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद देखील भुषवले होते सन २०१४ मध्ये त्यांनी महायुतीकडून बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

 महायुतीने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षासाठी एक जागा सोडली असल्याचे जाहीर केले मात्र लोकसभेची ही जागा नक्की कोणती असणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी महादेव जानकरांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र या सगळ्याबाबत आता महादेव जानकर यांनी स्वतः खुलासा करत आपण परभणी लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान परभणीच्या दिशेने आपण प्रचारार्थ निघालो असून परळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी प्रज्ञाताई मुंडे यांची भेट घेतल्याचे छायाचित्र जानकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर झळकवले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या