🌟भोकर येथील श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृह बांधकामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर....!


🌟राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्या वचनपूर्तीने बंजारा समाजात आनंदाचे वातावरण🌟

भोकर (दि.६ मार्च) - बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या भोकर येथील सामाजिक सभागृहाची मागणी बंजारा समाज बांधवानी माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती त्यावेळी दिलेल्या वचनाचीपूर्ती करण्यासाठी अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृह बांधकामासाठी ७ कोटींचा निधी ,बालाजी मंदिर ते बोरगाव रस्ता सुधारणांसाठी ३ कोटी व नगरपरिषद इमारत उर्वरित बांधकामासाठी ६ कोटी असा भोकरच्या विकासासाठी १६ कोटींचा निधी मंजूर करून घेतला असल्याचे वृत्त भोकरला धडकताच बंजारा समाजात आनंदाचे वातावरण तसेच भोकरवासियांनीही समाधान व्यक्त केले आहे.

  भोकर तालुक्यात सिंचन,दळण-वळण,उड्डाणपूल आदी विविध विकास कामांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी भोकरचा कायापालट केला आहे. अद्यापही प्रलंबित विकास कामांसाठी शासनांकडे पाठपुरावा सुरूच आहे.बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या नावाचे भोकर शहरात माजिक सभागृह असावे अशी मागणी बंजारा समाज बांधवांची होती. नांदेड येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळा उभारणीचे आश्वासन खा.अशोकराव चव्हाण यांनी पूर्ण केल्या नंतर भोकरच्या बंजारा समाज बांधवांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्यात  श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृहासाठी साकडे घातले त्याचक्षणी अशोकराव चव्हाण यांनी  श्री संत सेवालाल महाराज यांचे भोकर येथे भव्य असे  सामाजिक सभागृह उभारण्याचे आश्वासन दिले होते.

 भोकर येथे श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृह,बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता रस्ता सुधारणा तसेच नगरपरिषद इमारत उर्वरित बांधकामासाठी अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यास यश आले असून श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृह बांधकामासाठी ७ कोटींचा निधी ,बालाजी मंदिर ते बोरगाव रस्ता सुधारणांसाठी ३ कोटी व नगरपरिषद इमारत उर्वरित बांधकामासाठी ६ कोटी असा भोकरच्या विकासासाठी १६ कोटींचा निधी मंजूर करून घेतला असल्याचे वृत्त भोकरला धडकताच बंजारा समाजात आनंदाचे वातावरण तसेच भोकरवासियांनीही समाधान व्यक्त केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या