🌟ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहकांना मिळालेले अधिकार व हक्कांसाठी ग्राहकांनी नेहमी जागरूक रहावे....!

🌟जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.जयश्री रोडगे यांचे आवाहन🌟 

परभणी (दि.१८ मार्च) : परभणी येथील कै.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात होम सायन्स विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात ‘अन्नभेसळ व ग्राहकांची जबाबदारी’ या विषयावर डॉ.जयश्री रोडगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. संगीता अवचार,होम सायन्स विभागाच्या प्रा.कांचन बनसोडे, प्रा. सना कौसर यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.

      यावेळी बोलतांना डॉ.जयश्री रोडगे म्हणाल्या की ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहकांना मिळालेले अधिकार व हक्कांसाठी ग्राहकांनी नेहमी जागरूक रहावे यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे ज्यामुळे अन्नभेसळ होणार नाही व त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होणार नाही. याची खबरदारी घेतली पाहिजे. स्वाती गायकवाड यांनी सर्टिफिकेशन मार्क्स (प्रमाणन चिन्हे) या विषयावर बोलत असताना अन्न भेसळ या विषयावर सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ संगीता आवचार यांनी बाजारात आपली फसवणूक केली जाऊ नये यासाठी आपण वस्तू खरेदी करताना सजग असले पाहिजे, असे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सना कौसर तर सूत्रसंचालन व आभार प्रा. कांचन बनसोडे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या