🌟मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचा नामदार जगन्नाथ शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असा नामविस्तार करण्यास दिरंगाई का होतेय ?


🌟अशी मागणी विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी केला आहे🌟


नाशिक (प्रतिनिधी) - चार वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक १२ मार्च २०२० रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र शासनास मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचा नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असा नामविस्तार करण्याचा कॅबिनेट मंत्रिमंडळाचे बैठकीत प्रस्ताव मंजूर करून केंद्र शासनास पाठविला होता. अजूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यावेळी जे उपमुख्यमंत्री होते ते विद्यमान महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यावेळी जे पंतप्रधान होते, ते आजही आहेत. आजही ते मेरा भारत, मेरा परिवार अशी गारंटी (गॅरंटी, हमी) देत आहेत. असे असताना भारतीय रेल्वेचे जनक स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानचे शिल्पकार असलेले नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव मंजूर करण्यास एवढी दफ्तरदिरंगाई का होत आहे ? वादातीत विकासपुरुष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल या सोनार समाजाच्या मागणीसंदर्भात का दिरंगाई होत आहे याचे उत्तर संबंधित देतील काय ? असा प्रश्न सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संस्थापक श्री मिलिंदकुमार सोनार युनिव्हर्सल विश्वकर्मा फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शांताराम दुसाने, सोनार समाजसेवक राजाभाऊ सोनार नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान मुंबईचे सरचिटणीस ॲड श्री मनमोहन चोणकर, यांच्यासह विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी केला आहे.

ज्या व्यक्तिमत्त्वाने स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानची केवळ  विकासस्वप्नेच पाहिली नाहीत, तर ती सिद्धीस नेण्याचा अथक प्रयत्न करून भारतीय रेल्वेचा पाया घातला. व्यापार, उद्योग, यांच्या वृद्धीसाठी अतोनात प्रयत्न केले, स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानात, मुंबईत पहिली मुलींची शाळा नेटिव्ह गर्ल्स स्कूल सुरु केली, स्त्री शिक्षणाचा पाया घातला, अशा वादातीत विकासपुरुष नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असा नामविस्तार लोकसभा निवडणुकीपूर्वी करावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या