🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ.....!


🌟अंतर्गत अर्ज स्विकारण्यास आता दि.31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे🌟

परभणी (दि.05 मार्च) : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत अर्ज स्विकारण्यास आता दि.31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेतंर्गत अद्याप अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 31 मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) परभणी मनपा व मनपा हद्दीपासून 5 कि.मी. परिसरामधील महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांनी या कार्यालयात तसेच तालुकास्तरावरील अर्ज संबंधीत वसतिगृहाचे गृहपाल यांचेकडे सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त गिता गुट्टे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या