🌟पुर्णेतील लिंगायत समाजबांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनोख्या पध्दतीने साजरी केली होळी.....!


🌟लिंगायत स्मशानभूमीतील वाढलेले काटेरी झाड झुडप,वेल, केरकचरा एकत्रित करुन पर्यावरण पूरक होळी उत्सव साजरा🌟 


पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णेतील लिंगायत समाजबांधवांनी आज रविवार दि.२४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत अनोख्या पध्दतीने होळी महोत्सव साजरा केला यावेळी लिंगायत समाज बांधवांनी एकत्रित जमून सेवाभाव जोपासत शहरातील पुर्णा नदीकाठावरील लिंगायत स्मशानभुमित वाढलेले काटेरी झाड झुडप,वेल केर कचरा आदींसह निरुपयोगी वस्तू एकत्रित करुन त्यांची होळी करुन अनोख्या पद्धतीने पर्यावरण पूरक होळी उत्सव साजरा केला.


यावेळी दरवर्षी प्रमाणे होळी सनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ०६-०० ते ०८-३० वाजेच्या वेळेत लिंगायत समाज बांधवांनी करीत होळी सन साजरा केला होळी उत्सवच नव्हे तर लिंगायत समाजातील युवक दर रविवारी श्रमदान करत स्मशानभूमीतील झाडांना खतपाणी टाकणे,स्वच्छ्ता मोहीम राबवून स्मशानभूमीची स्वच्छता करीत असतात नित्यनियमाणेच आज होळी सनाच्या दिवशी लिंगायत समाजातील युवकांनी स्मशानभूमीतील वाढलेल्या झाडांची छाटणी करून परिसरात कचरा ,निरुपयोगी साहित्य, झाडांची पाने, काटेरी वनस्पती,प्लास्टिकच्या वस्तू,पाणी पाऊच आदी एकत्र करत आज सकाळी ०८-३० वाजता होलीका दहन केले.

यावेळी उपस्थित लिंगायत युवकांनी सर्व समाजातील राग ,द्वेष,कटुता नष्ट व्हावी यासाठी आणि सर्व समाजबांधव एकमेकांशी प्रेम भावनेने वागवेत आनी आपसी संबंध दृढ व्हावेत अशी प्रार्थना केली, यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये ची. सुशांत आणि वेदांत हेसे,सोहम भालेराव, शिवशंकर स्वामी, विजय स्वामी, वैभव फुलारी, किशोर गाढवे, मंगेश कापुस्करी, नागनाथ हेसे, सर्वेश एकला रे, अमोल मिटकरी, बबलू यस्के, राहुल बरदाले, चंदू कापसे, संतोष मीटकरी, प्रकाश कापसे, शंकर गलांडे,संजय यस्के, इं.अविनाश यसके , इं. नागनाथ कापुस्करि, विजय भालेराव, शिवप्रसाद देवणे, श्री तेजबंद, रमेश एकलारे आदींची उपस्थिती होती.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या