🌟नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज नागरी विमानतळावरुन दिल्ली जालंधरसह बैंगलूरुसाठी दररोज विमानसेवा....!


🌟नांदेड येथून हैद्राबाद-अहमदाबादला देखील विमाने धावणार🌟


नांदेड (दि.१५ मार्च) : नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज नागरी विमानतळावरुन येत्या ३१ मार्च २०२४ पासून स्टार एअरची विमानसेवा कार्यान्वित होणार असून नांदेड-दिल्ली,नांदेड-जालंधर, नांदेड-बैंगलूरु या शहरांसाठी दररोज विमानसेवा उपलब्ध राहणार असून यासह नांदेड येथून हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहरांसाठी सुध्दा विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

             नांदेड येथील विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडे आहे. परंतु,  गेल्या तीन वर्षांपासून या विमानतळावरील विमानसेवा येन-केन कारणांमुळे पूर्णतः ठप्प आहे. त्याचा परिणाम नांदेडवासीयांना सहन करावा लागला असून विशेषतः नांदेड येथील गुरुगोविंदसिंह यांच्या गुरुद्वारास दर्शनाकरीता येणार्‍या भाविकांना मोठा तडाखा बसला आहे. शीख बांधवांना अन्य मार्गाने नांदेड येथे यावे लागत आहे.

          या पार्श्‍वभूमीवर नांदेड येथील विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावे, या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले. त्याचे परिणाम म्हणजे 31 मार्च पासून नवीन विमानसेवा सुरू होणार आहे. येथून दिल्ली, जालंधर, बैंगलूरू, हैद्राबाद आणि अहमदाबाद अशा पाच शहरांना विमानसेवा मिळणार आहे. विमानसेवा बंद पडल्यामुळे मोठ्या शहरांशी नांदेडचे कनेक्शन आता पुढे चांगले होणार असून तीन वर्षानंतर सुरु होणार्‍या या विमानसेवेचे स्वागतच होणार आहे.....

          हैद्राबाद -नांदेड ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, बधुवार, गुरूवार आणि रविवार अशी असेल. 7.55 वाजता हैद्राबाद येथून निघणारे विमान नांदेडला 8.45 वाजता पोहचेल. नांदेडहून हैद्राबादकडे सोमवार, मंगळवार गुरूवार आणि रविवार अशी फेरी हे विमान करेल. नांदेड येथून सायंकाळी 4.30 वाजात निघेल आणि हैद्राबादला 5.20 वाजता पोहचेल. बुधवारी नांदेड-हैद्राबाद या विमानसेवेचे वेळापत्रक सकाळी 9.15 वाजता नांदेडहून निघेल आणि हैद्राबादला सकाळी 10.5 वाजता पोहचेल. अहमदाबाद-नांदेड ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरूवार आणि रविवार अशी असेल. अहमदाबादहून दुपारी 2.45 वाजता निघालेले विमान सायंकाळी 4 वाजता नांदेडला पोहचेल. नांदेडहून अहमदाबादकडे जाणारे विमान सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवार अशा चार दिवशी उडेल. हे विमान सकाळी 9.10 वाजता नांदेडहून निघेल आणि 10.25 वाजता अहमदाबादला पोहचेल. बैंगलुरु येथून सकाळी 7.15 वाजता निघणारे विमान नांदेडला 8.35 वाजता पोहोचेल. नांदेड ते दिल्ली जाणारे विमान सकाळी 9 वाजता नांदेडहून निघेल आणि 11 वाजता दिल्ली येथे पोहचेल हेच विमान दिल्ली ते जालंदर असे राहिल ते दिल्ली येथून सकाळी 11.25 वाजता पोहचेल आणि 12.25 वाजता जालंदरला पोहचेल. जालंदरहून हे विमान पुन्हा दुपारी 12.50 वाजता निघेल आणि 1.50 वाजता दिल्ली येथे पोहचेल. दिल्ली ते नांदेड हे विमान दुपारी 2.15 वाजता दिल्ली येथून निघेल आणि नांदेडला दुपारी 4.15 वाजता पोहोचेल. नांदेड ते बैंगलूर जाणारे विमान दुपारी 4.45 वाजता निघेल आणि बैंगलूरू येथे सायंकाळी 6.05 वाजता पोहोचेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या