🌟परभणी येथील सौ.उर्मिलाताई सोनी 'आदर्श गृहिणी पुरस्कारा' ने सन्मानित.....!


🌟महिला उन्नती संस्थेने 'आदर्श गृहिणी पुरस्कार' देऊन त्यांचा यशोचित गौरव केला🌟 

परभणी  - महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ,भारत सरकारच्या निती आयोगामार्फत राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या ' महिला उन्नती संस्थे ' तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त परभणी येथील आदरनिय व्यक्तीमत्वाच्या धनी , सौ.उर्मिलाताई अशोक सोनी यांना 'आदर्श गृहिणी पुरस्कार' प्रदान करून  गौरव केला आहे.

सध्याच्या काळात लोप पावत चाललेल्या 'एकत्र कुटुंब पद्धती ' मध्ये आता पर्यंत टिकून असलेले सर्वांना प्रेरणादायी ,संस्कारक्षम , कुटुंबवत्सल ' कुटुंब ' परभणी येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ, 'परभणी भूषण ' ॲड.अशोक घनश्यामदासजी सोनी यांचे आहे , आणि त्याचे सर्व श्रेय सोनी साहेबांच्या सहचारिणी आदरणीय सौ. उर्मिलाताई सोनी यांच्याकडे जाते .त्यांचा प्रेमळ, मायाळु स्वभाव ,सहनशीलतेचा सागर , निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व असलेल्या ,आप्तेष्ट नातेवाईक व घरी येणाऱ्या अभ्यागतांचे आदरतिथ्यामध्ये कुठलीच उणीव भासु न देणाऱ्या  उर्मिलाताई खरोखरच या पुरस्कारास पात्र आहेत.महिला उन्नती संस्थेने ' आदर्श गृहिणी पुरस्कार ' देऊन त्यांचा यशोचित गौरव केला आहे .

सौ उर्मिलाताईच्या आदर्श व्यक्तीमत्वाची दखल घेऊन, इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा व महिला उन्नती संस्थेच्या  प्रदेशाध्यक्षा श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष मदन (बापू )कोल्हे यांनी , जागतिक महिला दिनानिमित्त सौ.उर्मिलाताई अशोक सोनी यांचे निवासस्थानी जाऊन महिला उन्नती संस्थेचा ' आदर्श गृहिणी पुरस्कार '  सम्मानपत्र,व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव केला आहे  .

        याप्रसंगी मा.ॲड .अशोक सोनी सरांसोबत  'इरा 'चे मीडिया चीफ देवानंद वाकळे,फोटोग्राफर अध्यक्ष संजय घनसावंत हे उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या