🌟पुर्णा तालुक्यातील वझूर येथे महसूलच्या पथकाची वाळू तस्करी विरोधात चोवीस तासांच्या आत दुसरी कारवाई....‌!


🌟महसुल पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुन्हा एक ट्रॅक्टर घेतले ताब्यात🌟 


पुर्णा (दि.२१ मार्च) - पुर्णा तालुक्यातील अवैध वाळू तस्कर माफियांच्या विरोधात महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईसत्राला सुरुवात केली असून महसूल पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार प्रशांत थारकर व पथकातील सहकारी मंडळ अधिकारी काकडे,कोतवाल देवणे,मोरे,दाढे,कलसाईतकर,शेलाते यांनी काल बुधवार दि.२० मार्च २०२४ रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास देऊळगाव दुधाटे येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर ट्राली व वाळू उपसा करण्यासाठी वापरला जाणारा तराफा ताब्यात घेण्याच्या कारवाईला चोवीस तासही उलटत नाही तोच आज गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री ०२-०० ते ०३-०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील वझूर येथील नदीपात्रातून अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर व ट्राली ताब्यात घेऊन ताडकळस पोलीस स्थानकात जमा केली.

 पुर्णा तहसिलचे नायब तहसीलदार तथा महसूल पथकाचे प्रमुख प्रशांत थारकर यांनी लोकसभा निवडणुकीतील कामातून वेळात वेळ काढून वाळू तस्कर माफियांचा मागोवा घेत चोवीस तासांच्या आत बुधवारी/गुरुवार रोजी अवैध वाळू तस्करी साठी वापरल्या जाणारे दोन ट्रॅक्टर ट्रालीसह व एक तराफा ताब्यात घेण्याची केलेली कारवाई निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल त्यांनी केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या