🌟परभणी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे ५ मार्च रोजी आयोजन....!


🌟जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासह गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करण्याचा उद्देश🌟

परभणी (दि.०१ मार्च) :  उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसाय यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२४ चे आयोजन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली इंडीयन मेडीकल असोसिएशन हॉल येथे दि. ०५ मार्च रोजी आयोजन  करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयाला विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे आदि या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रातील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचा अनुभव इ. बाबीचा समावेश असेल, त्यात प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्याच्या उत्पादनाचे प्रदर्शन, निर्यातक्षम उत्पादन भौगोलिक मानांकने असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यातील स्थापित औद्योगिक समूह, विविध योजनांचे लाभार्थी यांची उत्पादने यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.    

 परिषद जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष, उद्योग संचालनालय, मुंबई सोडबी बैंक, जिल्ह्यातील बँका, उद्योजक संघटना, शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार व जिल्ह्यातील संबंधीत शासकीय यंत्रणांचे प्रमुख यांचे सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व उद्योजक संघटना, उद्योजक, शेती उत्पादक संस्था व नव उद्योजकांनी या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.

*****

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या