🌟राशन कार्डला आधार सलग्न करण्यासाठी विशेस कार्यक्रम राबवून गोर गरीब जनतेस राशन धान्य मिळवून देण्यात यावे.....!


🌟नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते भास्कर तुम्मा यांनी निवेदनाद्वारे केली आहे🌟  

नांदेड (दि.०४ मार्च) - नांदेड जिल्ह्यातील राशन कार्डला आधार कार्ड सलग्न करण्याच्या मोहीमेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागास तात्काळ सूचना देऊन गोरगरीब जनतेला शासकीय स्वस्त धान्य मिळवून देण्यास सहकार्य करावे अशी मागणी सामाजिक भास्कर तुम्मा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली असून या मागणीला पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर ही पुरवठा विभागाला जिल्हा प्रशासनाकडून मागणी संदर्भात कुठल्याही प्रकारचे आदेश काढण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते भास्कर तुम्मा यांनी दिलेल्या निवेदनावर शासनात असे नमूद केले आहे की गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम आधार सलग्नित राशन कार्डच्या माध्यमातून सुरु केलेला आहे. परंतु काही जनतेनी आता पर्यंत राशन कार्डला आधार सलग्न केलेले नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळताना दिसून येत नाही. तसेच राशन कार्डाला आधार सलग्न करण्यासाठी संबंधित विभागाकडे राशन कार्ड धारक गेले असता आधार राशन सलग्न प्रणाली बंद आहे किंवा इतर उडवा उडवीची उत्तरे मिळतात.

सदरील बाब हि अतिशय गंभीर बाब समजून तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन राशन कार्डला आधार सलग्न करण्यासाठी विशेस कार्यक्रम राबवून गोरगरीब जनतेस सहकार्य करावे असेही निवेदनात भास्कर तुम्मा यांनी म्हटले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या