🌟देऊळगाव दुधाटे येथे माझी पहिली कमाई आनंदनगरी कार्यक्रम संपन्न....!


🌟राज्यातील ग्रामीण भागातील मोठ्यात मोठा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला🌟


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माहेरघर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव दुधाटे येथे सहशालेय उपक्रमाअंतर्गत मुलांना नफा ,तोटा, विक्री कळावी. भविष्यातील व्यावसायिक, उद्योजक ग्रामीण भागातून निर्माण व्हावे, शेतकरी, कष्टकरी ग्रामीण भागातील मुलांना विक्री कौशल्य निर्माण व्हावे,आनंद वाटावा, अश्या कीतीतरी गोष्टी नजरेसमोर ठेवून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्वरूपात माझी पहिली कमाई आनंद नगरी चे आयोजन करण्यात आले होते.


राज्यातील ग्रामीण भागातील मोठ्यात मोठा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला. गावात आज झालेली आनंद नगरी 100% यशस्वी झाली कारण 53 स्टाॅल,एकही खायचा पदार्थ रेडीमेड नव्हता.सर्व पदार्थ घरी तयार केलेले होते. गावातील गावकरी,पालक ,माताभगीनी भरपूर लोकांची उपस्थिती होती. जवळपास 17173 रूपयांची उलाढाल या कार्यक्रमात झाली.गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,समस्त गावकरी मंडळींची,पालकांची  उपस्थिती ,भव्य,दिव्य ऐतिहासिक अशीच होती. अपेक्षेपेक्षा कीतीतरी मोठा प्रतिसाद मिळाला.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिवकन्या देवडे,सीमा पौळ,वैशाली शिसोदे,गंगाधर लांडे,मुंजादेव मुंडे,शत्रुघ्न मिराशे,आबनराव पारवे यांनी परिश्रम घेतले.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या