🌟नांदेड विमानतळावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत....!


🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड विमानतळावरुन चेन्नईला रवाना🌟


नांदेड (दि.०४ मार्च) : नांदेड येथील श्री.गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर आज सोमवार दि.०४ मार्च २०२४ रोजी दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदीलाबादवरून आगमन झाले विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेड येथून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले नांदेड विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,खा.हेमंत पाटील, खा.डॉ.अजित गोपछडे,आ.रामपाटील रातोळीकर,आ.तुषार राठोड,आ.राजेश पवार,आ.श्यामसुंदर शिंदे,आ.बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकर,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या