🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव-कान्हेगाव रस्त्यावरच्या ओढ्यावरील नवीन पुलाचे निकृष्ट काम नागरिकांनी रोखले.....!


🌟पुलाच्या बांधकामासाठी जुन्याच फुटक्या पाईपांसह निकृष्ट सिमेंट व दगडखडी मशीन वरील कच्छचा वापर🌟


पुर्णा (दि.३१ मार्च) - पुर्णा तालुक्यातील फुकटगाव-कान्हेगाव रस्त्यावरच्या ओढ्यावरील नवीन पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदरील बांधकाम आज रविवार दि.३१ मार्च रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास फुकटगाव-कान्हेगाव येथील जागृक नागरिकांनी रोखून सदरील पुलावरून भविष्यात फुकटगाव,कान्हेगाव,ममदापूर आदी गावांतील नागरिकांसह मोठ्या प्रमाणात वाहनांची देखील वाहतूक होणार असल्याने भयंकर अपघातांची मालिका घडू शकते त्यामुळे सदरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करू नका अशी तंबी देखील संबंधित भ्रष्ट गुत्तेदाराला देण्यात आली.


पर्णा तालुक्यातील फुकटगाव-कान्हेगाव या रस्त्यातील ओढ्यावर पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होत असून संबंधित बांधकाम गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी संगणमत करुन या पुलाच्या बांधकामात कुठल्याही प्रकारच्या स्टिलचा वापर न करता विहीर खोदकामातील डबर तसेच दगडगीट्टी मशीन वरील कच्छमातीसह निकृष्ट दर्जाच्या सिमेंटचा वापर करीत या पुलात पुर्वीच्या जुन्या पुलातील निघालेल्या फुटक्या सिमेंट पाईपचा वापर करुन पुलाचे बांधकाम करीत असल्यामुळे फुकटगाव येथील मा.चेअरमन माणिकराव बोकारे,कान्हेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अंगद मोरे,मोतीराम बोकारे,पांडुरंग तातेराव,बोकारे,ज्ञानेश्वर नामदेव बोकारे यांनी सदरील पुलाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम रोखले असून बोगस बांधकाम करणाऱ्या संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या