🌟नांदेड जिल्ह्यातील बारड येथे आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी अवैध दारू विरोधात स्थागुशाची धाडसी कार्यवाही.....!


🌟अवैध दारू वाहतूक करणाऱ्या महिंद्रा बोलेरो वाहनासह एकूण ०९ लाख ४१ हजार ६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟

नांदेड (दि.१९ मार्च) - नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी अवैध दारू विरोधात धाडसी कारवाई करीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या महिंद्रा बोलेरो वाहनासह एकूण ०९ लाख ४१ हजार ६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 या घटने संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस उपनिरीक्षक आशिष सिताराम बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किशनराव विठ्ठलराव तिडके वय 50 वर्ष याचे विरोधात बारगड पोलीस स्थानकात गुरनं.२२/२०२४ चे कलम ६५ (अ), (ई ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किंगफिशर बिअर ४८ बॉटल किंमत ०८,२८०/- रुपयें,ट्युबरो बिअरचे ०८ बॉटल किंमत १४४०/-रुपयें,मॅकडॉल नंबर वन ५६ बॉटल किंमत १००८०/-रुपयें,रॉयल चॅलेंज ५४ बॉटल किंमत ९७२०/-रुपयें, इंटेरियल ब्लू ५१ बॉटल किंमत ८१६०/-रुपयें,रॉयल स्टॅग ०९ बॉटल किंमम २६२०/- रुपये,देशी भिंगरी दारू २३४५/-रुपयें असा एकूण ०९ लाख ४१ हजार ६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या