🌟राज्यातील सन्मानार्थी वृध्द साहित्यिक व कलावंतांच्या मानधनवाढीच्या निर्णयाचे परभणीत स्वागत....!


🌟क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट,बालगंधर्व सांस्कृतिक कला,क्रिडा व युवक मंडळ,राजीव गांधी युवा फोरम या संघटनांनी केले आभार व्यक्त🌟

परभणी (दि.१६ मार्च) : राज्यातील सन्मानार्थी वृध्द साहित्यिक व कलावंत यांच्या मानधनात राज्य सरकारने वाढ केल्याबद्दल  येथील क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट,बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रिडा व युवक मंडळ तसेच राजीव गांधी युवा फोरम या संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.

        या तीनही संघटनांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेवून वृध्द साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात वाढ करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु, सरकारने उशीरा का होईना दखल घेत वृध्द साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात वाढ केली.

          दरम्यान, या निर्णयाचे नाट्य निर्माता संजय पांडे यांच्यासह अन्य नाट्य कलावंतांनी जोरदार स्वागत केले. या कलावंतांच्या मानधनात 11 हजार रुपये एवढी वाढ करावी, अशी मागणी आपण निवेदनाद्वारे केली होती. पाठपुरावाही केला होता. राज्य सरकारने त्या संदर्भात ठोस निर्णय घेतल्याने वृध्द साहित्यिक आणि कलावंतांना दिलासा मिळाला आहे, असे मत पांडे यांनी व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या