🌟 मंगरुळपीरच्या 'गार्गीने' चमकवले देशपातळीवर नाव ; बाॅक्सिंग चॅम्पीयनशिपमध्ये भारतातुन दुसरा क्रमांक....!


🌟 वाशिम जिल्ह्यातील पहिली बाॅक्सिंग चॅम्पीयन ठरली गार्गी : गार्गी राऊतने केले बाॅक्सिंगमध्ये महाराष्टाचे प्रतिनीधीत्व 🌟 

🌟मुलीनेही खेळातुन करीअर घडवावे गार्गीचे आवाहन 🌟 


फुलचंद भगत

वाशिम:-स्पर्धा कोणतीही असो मुलीही काही कमी नाहीत हे ऊत्तम ऊदाहरण पुन्हा एकदा समोर आले असुन वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील रहिवाशी असलेल्या गार्गी राजेश राउत हिने महाराष्टाचे प्रतिनीधीत्व करत राष्टीय चॅम्पीयनशिपमध्ये भारतातुन दुसरा क्रमांक पटकावत सिल्वर पदक मिळवुन सर्वञ नावलौकीक केले आहे.मुलींनीही स्वतःला कुठेही कमी न समजता खेळामध्येही आपले करिअर घडवुन वेगळा ठसा ऊमटवावा असे आवाहन यावेळी गार्गी राउतने केले आहे.

              स्पर्धा म्हटली की जीवाचे रान करुन सराव सुरु केला जातो आणी ठरवलेले स्वप्न सत्यात ऊतरवण्यासाठी स्पर्धेला सामोरे जाणारे अनेकजन आहेत.असेच आपले स्वप्न ऊराशी बाळगुन खेळात करीअर करण्यासाठी मंगरुळपीर येथील गार्गी राऊतने टिव्हीवर विविध राष्टिय आंतरराष्टीय बाॅक्सिंग स्पर्धा पाहत स्वतःही बाॅक्सर बनन्याचा मनाशी चंग बांधला.आपण बाॅक्सिंगमध्ये चॅम्पीअनशिप मिळवायची यासाठी दिवसराञ सरावही सुरु केला आणी शेवटी मंगरुळपीरसारख्या छोट्या शहराचे नाव देशपातळीवर चमकवुन महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करत भारतातुन दुसरा क्रमांक पटकावुन बाॅक्सींग स्पर्धेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.तिसर्‍या सबज्युनिअर मुलींच्या बाॅक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 19 ते 25 मार्च 2024 दरम्यान ग्रेटर नोएडा उत्तरप्रदेश येथे पार पडली. यामध्ये देशातील 32 राज्यातील बॉक्सर सहभागी झाले होते.इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मुले, मुली सुद्धा या देश पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाले होते.यात अकोल्यातील 8 मुले व 2 मुलींची ह्या महाराष्ट्रातील संघात निवड झाली होती. यात सध्या अकोला येथे शिक्षण घेत असलेली मंगरुळपीर तालुक्यातील कु. गार्गी राजेश राऊत हिची सुद्धा या राष्ट्रीय स्पर्धेकारिता निवड झाली होती.या स्पर्धेत तिचा पहिला सामना मध्य प्रदेश, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा गुजरात च्या मुलीसोबत झाला यात तिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत फायनल मध्ये प्रवेश केला. फायनल मध्ये तिचा सामना चंदीगढ च्या इशिका सोबत झाला. रजत पदक प्राप्त करत गार्गी ने 55 ते 58 या वजन गटात देशातून दुसरा क्रमांक पटकाविला.मंगरुळपीरला गार्गी पोहचल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करुन व पुष्पगुच्छ देवू स्वागत केले तसेच परिसरात पेढे वाटुन सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.बॉक्सिंग या खेळात नावलौकिक मिळवणारी वाशीम जिल्ह्यातील गार्गी ही पहिली बॉक्सिंग चॅम्पियन ठरली आहे.या यशाचे सर्व श्रेय अकोल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतिषचंद्र भट्ट,तीचे बॉक्सिंग कोच राहुल वानखडे व तिच्या आई वडिलांना देते.मुलींनीही खेळात करीअर घडवावे असे आवाहन यावेळी गार्गीने केले.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या