🌟व्हिडिओ व्हॉलेंटीअर गोवा तर्फे ॲडव्होकेट रेखा हणमंते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित....!

   


🌟त्यांना मिळालेल्या 'नारी शक्ती' पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟 

अर्ध्या शतकाच्या निरंतर सामाजिक व विशेषतः महिला जागृती व समुपदेशन कार्यास वाहून घेण्याच्या जिद्दीचा व आंतरिक इच्छाशक्तीचा हा सन्मान म्हणजे नारी शक्तीचाच गौरव होय - डॉ.डी.व्ही.खरात.

✍️ मोहन चौकेकर 

थॉमेल काठमांडू नेपाळ - विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण, गौरवास्पद तथा ऐतिहासिक व अविस्मरणीय कार्यास्तव देशभरंच नव्हे तर आंतर्राष्ट्रीय स्तरावर किर्तीमान प्रस्थापित करण्याची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरीची परंपरा तशी सर्वश्रुतंच आहे. प्रचंड जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मानवीय सेवाभावी वृत्ती यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यात विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल की नारीशक्तीही कुठे कमी नाही. याच परंपरेतील एक म्हणून ज्यांच्याकडे बोट दाखविता येईल असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ॲडव्होकेट रेखा श्रावणराव हणमंते, ज्यांना त्यांचे धम्मकार्यास आजन्म वाहून घेतलेले अंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त व " द मॉन्क इन व्हॉईट ड्रेस " म्हणून जे ओळखले जातात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगप्रसिद्ध पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष असलेले व अजिंठा लेणी नजिक ज्यांनी आंतर्राष्ट्रीय पाली भाषा संस्कार व संवर्धन केंद्र प्रस्थापित केले आहे असे डॉ. एस्. पी. गायकवाड, नांदेड हे मामा तथा फुले - आंबेडकरी विचार व चळवळ घराघरात पोचवणारे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे पहिले शिष्य कवी - गायक - कलावंत माजी न्यायाधीश दि. एस्. आर. गायकवाड, औरंगाबाद/संभाजीनगर हे दुसरे मामा यांच्याकडून सामाजिक सेवेचे बाळकडू मिळालेले आहे, त्यांना, त्यांच्या या सेवा कार्याची दखल घेऊन, आपल्या युवावस्थेतंच विश्वविख्यात स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲंबेसेडर म्हणून मजल मारणारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद/संभाजीनगर मध्ये अर्थशास्त्र प्राध्यापक म्हणून सेवारत असणारे तसेच बालपणापासून  सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य तथा उपक्रमांशी बांधिलकी जपणारे तथा साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद/संभाजीनगर चे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संघर्ष सावळे यांच्या संस्थेतर्फे नुकतेच 

" अंतर्राष्ट्रीय महिला जागृती व समुपदेशन " या गौरवशाली पुरस्काराने सन्मानित केले असून सदर पुरस्कार त्यांना,संस्थेतर्फे दि. १४-०२-२०२४ ला सुप्रसिद्ध रारा कॉन्फरन्स हॉलच्या थॉमेल काठमांडू नेपाळ येथील अलीशान सभागृहात, साहित्यिक क्षेत्रात संशोधक लेखक म्हणून आपला वेगळा ठसा उमटविणारे तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद/संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अंतर्राष्ट्रीय संत सेवालाल जयंती उत्सव तथा पुरस्कार वितरण समारोह व अंतर्राष्ट्रीय स्तरावर झेप घेतलेल्या ' त्या तरूच्या सावलीला चल सखे बोलू जरा..... ' चे कवी-गायक आणि सोबतच आपल्या सामाजिक क्षेत्रातील अखंड कार्यासाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आंतर्राष्ट्रीय कवि संमेलन सोहळ्यामधे ख्यातकीर्त लेखक व संवेदनशील साहित्यिक तथा सामाजिक क्षेत्रात आपल्या मानवीय सेवाभावी कार्यासाठी अंतर्राष्ट्रीय ओळख असणाऱ्या माजी न्यायाधीश आयुष्मान नामदेवराव चव्हाण, मुंबई व महाराष्ट्र मंत्रालयाचे माजी जॉईंट सेक्रेटरी आणि सामाजिक जाणीवेशी सातत्याने नाते जपणारे ज्येष्ठ साहित्यिक आयुष्मान राजाराम जाधव, मुंबई, प्रख्यात कवयित्री आयुष्मती शोभा वेले, नागपूर, आपल्या अविरत सामाजिक व निष्ठावान कार्यास्तव साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त आणि छत्रपती शाहू महाराज जयंती, २०२३ निमित्त सामाजिक न्याय पुरस्काराने गौरवण्यात आलेले व नेपाळ येथील या अंतर्राष्ट्रीय कवि संमेलन तथा संत सेवालाल जयंती व पुरस्कार सोहळ्यामध्ये अंतर्राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. डी. व्ही. खरात सर, चिखली या माननीय विद्वत्जनांसोबत इतरही बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमधे साहित्यधारा ब. से. संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे यांनी, अंतर्राष्ट्रीय महिला जागृती व समुपदेशन या अतिशय मानाच्या पुरस्काराने ॲडव्होकेट रेखा श्रावणराव हणमंते यांना सन्मानित केले. मात्र या सोहळ्यादरम्यान एका सामाजिक प्रकरणानिमित्ताने ॲडव्होकेट रेखा हणमंते यांना छत्तीसगढ येथे जावे लागल्याने, त्यांच्या वतीने, त्यांचा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक तथा कथाकथनातील नैपुण्यामुळे अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट डिलिट प्राप्त डॉ.बबनराव महामुने, हिवरा आश्रम यांनी हा पुरस्कार स्विकारला व भारतात परत आल्यानंतर चिखली येथे आयोजित सर्व अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नागरी सत्कार समारंभात, त्यांनी, ॲडव्होकेट रेखा हणमंते यांना त्यांचा पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्रासह सुपूर्द केला. याबद्दल मित्र मंडळी तथा नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन सुरू असतांनाच व्हिडिओ व्हॉलेंटीअर, गोवा या अंतर्राष्ट्रीय गौरवप्राप्त संस्थेतर्फे तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने त्यांना, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या ऊमादेवी सभागृहात डॉ. स्वाती वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व गोवा येथील सामाजिक कार्यकर्त्या अमृता आनंद, छात्रा युवा संघर्ष वाहीनी,नागपूर च्या आयुष्मती शुभदा देशमुख, सामाजिक कार्यासाठी सुपरिचित असलेल्या आयुष्मती यामिनी चौधरी, सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजिका डॉ.स्वाती केला, तथा सामाजिक व महिला विश्वात हिरीरीने सेवा कार्य करणाऱ्या व त्या निमित्ताने या अभिनंदनीय सोहळ्यामधे पुरस्कृत झालेल्या विविध क्षेत्रातील सन्माननीय महिला भगिनी तथा फुले-आंबेडकरी चळवळीत आजन्म निस्वार्थ कार्य करणाऱ्या सर्वश्रुत भाऊ भोजने, आयुष्मान विनोद वानखेडे,आयुष्मान अंकुश पडघान तथा बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत संबंधित संस्थेतर्फे आयोजित या बहुचर्चित समारंभामधे जागतिक महिला दिनाच्या पर्वावर, सन्मान नारीशक्तीचा हा पुरस्कार देऊन दि. १० मार्च, २०२४ रोजी ॲडव्होकेट रेखा श्रावणराव हणमंते यांना गौरवण्यात आले. त्यानिमित्त त्यांचे अभिनंदन करीत असताना डॉ.डी.व्ही.खरात सर यांनी उपरोक्त नमूद उदगार काढले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या