🌟आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घेतली सात्वन पर भेट....!


🌟कुटुंबास सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन🌟

गंगाखेड : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची प्रचाराची जमवाजमव करण्याची लगबग सुरू असताना सखाराम बोबडे पडेगावकर यांनी  मात्र गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बालासाहेब वैतागे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन  केले. लहान लेकरांना शासनाच्या मोफत इंग्रजी शाळे मध्ये प्रवेश म्हणून देण्या सोबतच शासकीय म्हणून मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासित केले.


वैतागवाडी येथील बालासाहेब बाबुराव वैतागे वय 32 यांनी सात दिवसापूर्वी दुष्काळी नापीकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून झाडाच्या फांदीला लटकून घेत आत्महत्या केली. ही बाब समजतात परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सात्वन केले. मयत शेतकऱ्याची आई वडील ,भाऊ, पत्नी व मुलांशी संवाद साधला. दोन मुलांना शासनाकडून मोफत इंग्रजी शाळेत प्रवेश योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. त्या शेतकऱ्याच्या घरूनच हिरकणी पब्लिक स्कूलचे संचालक अशोक लवटे सर यांच्याशी संवाद साधत मुलांचा प्रवेश घेण्याची विनंती केली. पत्नीच्या नावे असलेले फायनान्स ची कर्ज व वडिलांच्या नावे असलेली महाराष्ट्र बँकेचे कर्ज याला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणारी शासकीय मदत लवकर मिळावी यासाठी तहसीलदार ,तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संवादही साधला. यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक चिमाजी वैतागे, शेतकरी मित्र शेषराव आव्हाड उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या