🌟पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे नायब तहसीलदार थारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाची धडक कारवाई...!


🌟ट्रॅक्टरसह वाळू उपसण्यासाठी वापरातला तराफा घेतला ताब्यात🌟 

पुर्णा (दि.२० मार्च) - पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीररीत्या उत्खनन केलेल्या चोरट्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह वाळू उपसा करण्यासाठी वापरला जाणारा एक तराफा नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल प्रशासनाच्या पथकाने आज बुधवार दि.२० मार्च रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसिल व महसूल प्रशासनाचे अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने आता आपल्याला रान मोकळे असल्याच्या आवेशात अवैध वाळू तस्कर माफियांनी भरदिवसा पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील गोदावरी नदीपात्रांत अवैध वाळू उत्खननासह या चोरट्या वाळू वाहतुकीला सुरूवात केल्याची बाब नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांना समजताच त्यांनी आपल्या पथकातील सहकाऱ्यांसह तात्काळ देऊळगाव दुधाटे येथील गोदावरी नदीपात्रात धडक कारवाई करीत अवैध वाळूसह ट्रॅक्टर ट्राली व एक तराफा जप्त केल्यामुळे अवैध वाळू तस्कर माफियांमध्ये खळबळ माजली आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या