🌟'धूळधाण' कादंबरी एक संस्कृती उध्वस्त होतानाचा दस्तऐवज - प्रा.शेषराव मोहिते

(परभणीतील गंगाधर गायकवाड लिखित 'धूळधाण'या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ कादंबरीकार प्रा.शेषराव मोहिते यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजित भालेराव,प्रसिद्ध कथाकार डॉ. आसाराम लोमटे, कुसुम गायकवाड, शोभा गायकवाड, तुळशीदास लोंढे)

🌟परभणीतील गंगाधर गायकवाड लिखित 'धूळधाण' या कादंबरीचे कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत प्रकाशन🌟

परभणी : आजच्या गावच वास्तव चित्रण 'धूळधाण ' या कादंबरीत आलेले आहे. गावातील माणसे, भोवताल रेखाटणारी 'धूळधाण ' ही कादंबरी एक संस्कृती उध्वस्त होतानाचा दस्तऐवज आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. शेषराव मोहिते यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी व अक्षर प्रतिष्ठा च्या वतीने बी. रघुनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवार ( दि. २०) रोजी प्रा.शेषराव मोहिते यांच्या हस्ते गंगाधर गायकवाड लिखित ' धूळधाण ' या कादंबरीचे प्रकाशन झाले.

त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ.आसाराम लोमटे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. शेषराव मोहिते म्हणाले की, " कादंबरी हा लेखकाची अमर्याद क्षमता सिद्ध करणारा साहित्य प्रकार आहे. गंगाधर गायकवाड लिखित 'धूळधाण' ही कादंबरी माणसाच्या स्वभावाचा तळ शोधणारी, सामान्य माणसात प्रतिकूलतेवर पाय ठेवून पुढे जाण्याची वृत्ती असते. हे सांगणारी आहे. " प्रसिद्ध कथाकार डॉ. आसाराम लोमटे म्हणाले की, " 'धूळधाण' या कादंबरीत गावचे राजकारण, युवकांची बदलती मानसिकता असे गावाचे वास्तविक चित्रण गंगाधर गायकवाड यांनी मांडलेले आहे." प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव अध्यक्षिय समारोप करताना म्हणाले की, " 'धूळधाण' या कादंबरीत बोली भाषा बोलणारी माणसे आलेली आहेत. कादंबरीतील ती पात्र, ते गाव नक्कीच वाचकांना आपला वाटेल. " कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भगवान काळे यांनी केले. सुत्रसंचलन अरविंद सगर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मारूती डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमास कुसुम गायकवाड, शोभा गायकवाड, सरोज देशपांडे, बा.बा.कोटंबे , डॉ. केशव खटींग, प्रा. नितीन लोहट, अरूण चव्हाळ, सुरेश हिवाळे, बबन आव्हाड, बाबा कोटमबे, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, माणिक पुरी, माधव गव्हाणे, संध्या फुलपगार, राजेंद्र गहाळ यांच्यासह शहरातील साहित्यिक उपस्थित होते.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या