🌟महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षकांचा समावेश करा.....!


🌟परभणी जिल्हा कलाध्यापक संघाची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟

परभणी (दि.१४ मार्च) : महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षकांचा देखील समावेश करण्यात यावा अशी मागणी परभणी जिल्हा कलाध्यापक संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दि.१३ मार्च २०२४ रोजी केली आहे.

परभणी जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव लगड, सचिव अतुल सामाले, विभागीय उपाध्यक्ष माधव घयाळ, डी. एच. सोनकवडे, चंद्रकांत गरुड, शेख जाहेद उमर, रमाकांत पैंजणे, उद्धव पांचाळ,पंचशीला लहाने,कल्पना खटिंग आदी पदाधिकार्‍यांनी काल बुधवार दि.१३ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिका‍री रघुनाथ गावडे यांना आपल्या मागणी संदर्भात एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, शासनाच्या शैक्षणिक धोरणात कला विषयास विशेष स्थान दिले असतानाही सध्याच्या शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षक हे पद दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाशिक्षक हे पद अतिशय महत्त्वाचे आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास होऊन तो विद्यार्थी अवडीच्या कलेमुळे जीवनात आनंदी व समाधानी होत असतो. समाजात कलाविषयक अनेक रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध असताना शालेय पवित्र पोर्टल मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कला शिक्षक हे पद उडवण्यात आलेले आहे. अनेक शाळांत कला शिक्षकांच्या जागा या जवळपास मागील सात वर्षापासून रिक्तआहेत. या रिक्त जागेवर काही संस्थाचालक इतर शिक्षकांच्या जागा भरताना दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्यावतीने कला शिक्षक भरतीसाठी अनेक वेळा निवेदन सादर करूनही अद्यापही शासनाने याची दखल घेतलेली नाही, हे निदर्शनास आणून देत शासनाच्या पवित्र पोर्टल मध्ये कला शिक्षक हे पद घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या