🌟शालेय शिक्षणाबरोबरच जिवन शिक्षणाचे धडे शिकायलाच हवेत....!


🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टि.के.बिरादार यांचे प्रतिपादन🌟 


पुर्णा (दि.०३ मार्च) - पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टी के बिरादार सर यांच्या शिक्षण देण्याच्या शैलीतून वेगवेगळे उपक्रम हे आपल्या शाळेमध्ये राबवत असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना बाजारात गेल्यानंतर खरेदी विक्री कशी करावी यासाठी शाळेमध्ये बाजार भरवला जातो त्यानंतर सुट्टीच्या दिवशी शेतात आपल्या आई-वडिलांना कामात मदत व्हावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मुला-मुलींना जीवन शिक्षणाचे धडे हे शिक्षक देत असतात याच शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक टी के बिरादार सर, व त्यांचे सहकारी शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना शेतामधील कामांसाठी आई-वडिलांना हातभार कसा लावावा व आपल्या शेतातील निंदन असो वा झाडांची लागवड कशी करावं पाणी कसे द्यावे त्या झाडांचा संगोपन कसं करावं ही सर्व माहिती आपल्या विद्यार्थ्यांना देताना शेती विषयक अभ्यास व शेतीमधील काम हे विद्यार्थ्यांनाशिकवीत असतात. अगोदर विद्यार्थ्यांना स्वतः आपण करून दाखवतात व त्यांना असं पाहून शिकावं व ते आपल्या आई-वडिलांसोबत राहून सुद्धा शिकावं असा सांगणारा व  शिकवणारा शिक्षक म्हणजे गुरुजी असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव येथील मुख्याध्यापक टि.के.बिरादार यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या