🌟कारंजा येथे उष्मालाट बाबत तालुकास्तरीय एकदिवीय कार्यशाळा संपन्न....!


🌟या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री कुणाल झालटे तहसीलदार कारंजा हे होते🌟


फुलचंद भगत

वाशिम:- दिनांक 12 मार्च 2024 रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तहसील कार्यालय कारंजा व तहसील कार्यालय मानोरा यांचे संयुक्त विद्यमाने उष्मालाट बाबत तालुका स्तरीय एकदिवसीय कार्यशाळा विद्याभारती कॉलेज सभागृह कारंजा येथे आयोजित करण्यात आली.


 या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री कुणाल झालटे तहसीलदार कारंजा हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाहू भगत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम,प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री संतोष यावलीकर तहसीलदार मानोरा, मा.श्री अशोक देवरे प्राचार्य, विद्याभारती कॉलेज, कारंजा श्री डॉ. स्वप्निल हाके वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, कारंजा, श्री विनोद हरणे नायब तहसीलदार तहसील कार्यालय, कारंजा, श्री पवन भाऊ मिश्रा माती, पाणी अभ्यासक,श्री श्याम सवाई अध्यक्ष सर्वधर्म मित्र मंडळ, कारंजा, श्रीमती दत्ता मॅडम पिरामल फाउंडेशन आदी मंडळी मंचकावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना वातावरणातील बदल व वाढते तापमान,उष्मालाट बाबत काय काळजी घ्यावी तसेच गाव स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन समितीने नियोजन कसे करावे, पूर्व तयारी, उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी, त्यासंबंधी काय काळजी घ्यावी,उष्माघात कक्ष, उष्माघात रोखण्यासाठी काय उपाय योजना करण्यात याव्यात. उन्हापासून संरक्षण करायचे असेल तर वृक्ष लागवड, शेततळे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बांबू लागवड तसेच घराच्या छतावर चुना व फेविकॉल मिश्रित पांढरा रंग मारावा जेणे करून घर तापणार नाही व उन्हापासून संरक्षण करेल. तसेच उष्माघाता बाबत जाणीव जागृती करण्यासाठी आवाहन करण्यात आले. याबाबत विस्तृत व सखोल मार्गदर्शन शाहू भगत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,डॉ स्वप्निल हाके,श्री पवन भाऊ मिश्रा,श्री श्याम सवाई यांनी प्रशिक्षण दिले.तसेच सर्पदंश या विषयी कार्यशाळेत प्रा. राजा गोरे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य श्री अशोक देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मार्गदर्शन मा.श्री कुणाल झालटे तहसीलदार कारंजा यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाराम सरोदे  यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री कटके मंडळ अधिकारी यांनी केले.या कार्यशाळेला विविध विभागातील कारंजा व मानोरा तालुक्यातील अधिकारी, सरपंच, मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका इतर विभागाचे कर्मचारी यांची 700 च्यावर उपस्थिती होती.कारंजा तहसील कार्यालयाचे विनोद हरणे नायब तहसीलदार, राजाराम सरोदे,नित्यानंद डाखोरे, भागवत गुळदे,देवानंद कटके, राहूल वरघट,शाम सवाई, महेश बायस्कर,संगीता काळसरपे, सारिका रामटेके,आंचल बांडे  व मानोरा तहसील कार्यालयाचे श्री अजय खिराडे अव्वल कारकून ,श्री राघवते महसूल सहाय्यक, शिपाई श्री नितीन शिरसाट व इतर कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले व उत्तम नियोजन केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या