🌟नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे मीत जत्थेदार बाबा ज्योतिंदरसिघजी यांच्या संकल्पनेतून दशमेश ज्योत इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजची स्थापना....!


🌟सिख सिकलीगर समाजातील अनेक मुलांना धार्मिक सुसंस्कारासह उच्च प्रतीच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था🌟 


नांदेड (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) : नांदेड येथील जगप्रसिद्ध पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारातील मित जत्थेदार संत बाबा ज्योतिंदरसिघजी यांच्या अथक परिश्रम आणि दृढ संकल्पनेतून जवळपास एक दशकांपूर्वी नांदेड येथील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण चौक,माता साहेब गुरुद्वारा रोड गाडेगाव परिसरात सुसज्ज इमारत बांधकाम करुन दशमेश ज्योत इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजची स्थापणा करण्यात आली मित जत्थेदार संत बाबा ज्योतिंदरसिघजी हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या या सुसज्ज अशा इमारतीतील शैक्षणिक संस्थेत गोरगरीब-श्रीमंत यांच्यात कोणताही फरक केला जात नाही मित जत्थेदार संत बाबा ज्योतिंदरसिघजी यांनी मुळात दशमेश ज्योत इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजची स्थापणाच गरीब गरजवंत कुटुंबातील मुलांना उच्च प्रतीच्या इंग्लिश शिक्षणासह धार्मिक सुसंस्कार मिळावे याकरीता सुरू केली असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही.


मित जत्थेदार संत बाबा ज्योतिंदरसिघजी यांनी आपल्या या शैक्षणिक संस्थेत सिख सिकलीगर तसेच गोरगरीब समाजाच्या कुटुंबातील अनेक मुलांना मोफत प्रवेश मिळवून दिला आजपर्यंत जवळपास गोरगरीब सिख सिकलीगर कुटुंबातील ५० ते ६० मुल/मुली या दशमेश ज्योत इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून मोफत बससेवेतून मोफत शिक्षण घेऊन आपले शैक्षणिक भविष्य उज्वल करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. संत बाबा ज्योतिंदरसिघजी आपल्या या दशमेश ज्योत इंग्लिश मिडियम स्कूल मधील प्रत्येक विद्यार्थी/विद्यार्थीनींना मोफत गणवेश,मोफत शैक्षणिक साहित्यांसह मोफत जेवणाची देखील व्यवस्था करीत आहेत आपणा सर्वांनाच या गोष्टीचे ज्ञान आहे की देश स्वतंत्र झाल्याच्या तब्बल ७७ वर्षाच्या कालावधीत देखील संपूर्ण देशभरात सिख सिकलीकर समाजाची शैक्षणिक/आर्थिक तसेच अन्य क्षेत्रात केवळ झिरो टक्के प्रगती झालेली आहे असंख्य सिख सिकलीगर समाजाची कुटुंब आज देखील शिक्षणापासून वंचित आहेत असंख्य सिकलीगर कुटुंबीय उच्च शिक्षणापासून कोसो दूर आहेत.

नांदेड गुरुद्वारा येथील मित जत्थेदार संत बाबा ज्योतिंदरसिघजी यांनी दशमेश ज्योत इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून अश्या असंख्य गोरगरीब सिख सिकलीगर कुटुंबांसह गोरगरीबांच्या उच्च शिक्षणाच्या आशा जागवण्यास सुरुवात केली असून सिख सिकलीगर समाजाच्या कुटुंबातील मुला/मुलींनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे यासाठी बाबाजी यांनी संस्थेच्या वतीने उच्चशिक्षित शिक्षक या मुलांसाठी शिकवणी करीता उपलब्ध करुन दिले तर जुना कौठा परिसरात सिख सिकलीगर सोसायटीचे अध्यक्ष बलजीतसिंघ बावरी यांनी संगणक प्रशिक्षण व शिकवणी करीता सोसायटीच्या वतीने सेवेत ३० बाय ३० चा सुसज्ज असा हॉल तयार करून दिला.संत बाबा ज्योतिंदरसिघजी यांच्या आशिर्वादाने सिख सिकलीगर कुटुंबातील मुल/मुली उत्तम प्रकारे अभ्यास करुन आपलं भविष्य घडवतांना पाहावयास मिळत आहे.

दशमेश ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये सिख सिकलीगर समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना मिळणारे धार्मिक सुसंस्कारासह उच्च प्रतीचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण पाहता जुना कौठा येथील हॉल मध्ये इंग्लंड येथील रहिवासी सरदार भाई पिंदरपालसिंघजी चढ्ढा यांनी यापूर्वी पाच संगणकांची (कंप्युटर) सेवा भेट दिली होती विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता त्यांनी पुन्हा पाच संगणकांची सेवा भेट केली आहे अशा प्रकारे जुना कौठा येथील हॉल मध्ये १० संगणकांची सेवा सरदार भाई पिंदरपालसिंघजी चढ्ढा यांनी भेट दिली आहे इंग्लंड येथील रहिवासी असलेल्या भाई पिंदरपालसिंघजी चढ्ढा यांच्या अनमोल सेवेतून संगणक वर्ग करण्यात आले आहेत त्यामुळे सर्व मुला/मुलींना संगणकाचे मोफत शिक्षण दिले जात आहे संगणक वर्ग ही सर्वात मोठ्या जवाबदारीची गोष्ट आहे याची सुरुवात करण्यास सर्वात मोठे योगदान म्हणजे तेलंगणा राज्यातील सिख सिकलीगर सोसायटीचे प्रवक्ते भाई हरदेवसिंघजी यांनी मोलाचे सहकार्य केले संगणक शिकवणीची सर्व काळजी त्यांच्याच देखरेखीखाली केली जात आहे.

नांदेड गुरुद्वारा येथील मित जत्थेदार तथा दशमेश ज्योत इंग्लिश स्कूलचे सन्माननीय सस्थांपक संत बाबा ज्योतिंदरसिघजी यांच्यासह सिख सिकलीगर सोसायटीचे प्रवक्ते भाई हरदेवसिंघजी तसेच इंग्लंड येथील दानशूर व्यक्तीमत्व सरदार भाई पिंदरपालसिंघजी चढ्ढा तसेच गोरगरीब सिख सिकलीगर कुटुंबातील मुला/मुलींच्या शिक्षणाची जवाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडणारे संस्थेतील शिक्षकवृंद यांचे सिख सिकलीगर सोसायटीचे अध्यक्ष बलजीतसिंघ बावरी यांनी संपूर्ण सिख सिकलीगर समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या