🌟पाथरीत सकल मराठा समाजाची बैठक संपन्न ; परभणी लोकसभेला चारशे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार....!


🌟पाथरी शहरातील शिक्षक कॉलनीतील जागृत हनुमान मंदिरात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न🌟

प्रतिनिधी

परभणी/पाथरी :- मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्यात सगेसोयरे अधिसुचनेचे रुपांतर अध्यादेशात करावे या साठी आता मराठा समाज आंदोलनाचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करून ईव्हिएम मशीनच कोमात घालून निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत या निर्यावर ठाम झाला असून शनिवार ९ मार्च रोजी पाथरी शहरातील शिक्षक कॉलनीतील जागृत हनुमान मंदिरात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली यात पाथरी तालुक्याच्या प्रत्येक गावातून दोन ते तीन उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे करून जास्तित जास्त चारशे उमेदवारी अर्ज परभणी लोकसभा मतदारसंघात दाखल करणार असल्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

मराठा आरक्षण आंदोलनात या पुर्वी ही पाथरी तालुक्याचे योगदान मोठे राहिले आहे. मागील सहा महिन्या पासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत कुनबी म्हणून आरक्षण द्या म्हणून आंदोलन करत आहेत. यात ६३ हजार कुनबी नोंदी सापडल्या देखील. मात्र यात सगेसोयरेची  शासनाने अधिसुचना काढली आहे. या अधिसुचनेवर आता अध्यादेश काढून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी करत आहेत. त्यावर शासन उलटा डावटाकत पाटलांवर एसआयटी लावत विविध गुन्हे दाखल करत आहे. या मुळे संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून मराठा समाज पहिल्या पेक्षाही जास्त आक्रमक झाल्याचे दिसुन येत आहे. जरांगे पाटलांच्या बैठकांना आता सभेचे स्वरुप येत आहे. 

याच आंदोलनाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिण्यात तालुक्यातील चाटेपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र २ मधील महिला राखीव जागे साठी पोटनिवडणुक लागली होती. या वेळी या गावातील मराठा समाजाने महिला राखिव असलेल्या या जागे साठी तब्बल २०३ तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या वेळी छाननी नंतर १५५ उमेदवारी अर्ज राहिल्याने आणि एवढ्या मोठ्या संखेतील उमेवार उभे असल्याने ही निवडणुक घेता येणार नाही असे पत्र निवडणुक आयोगाने जारी केल्याने चाटेपिंपळगाव ची पोटनिवडणुक रद्द झाली होती. या विषयीच्या बातम्या प्रिंट आणि इलेक्टॉनिक मिडिया मधून व्हायरल झाल्या नंतर आता हाच फॉर्म्युला मराठा समाज महाराष्ट्रात आणि बाहेर प्रमुख उमेदवारां समोर वापरुन गणिमिकावा करणार असल्याचे सांगत असून या विषयी बैठका होऊन निर्णय घेत काटेकोर नियोजन करून जबाबदा-या दिल्या जात आहेत. पाथरी शहरातील शिक्षक कॉलनी येथील जागृत  हनुमान मंदिरात शनिवारी दुपारी १२ वा सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली त्यात शासनाने सगेसोयरे चा अध्यादेश त्वरीत काढावा अन्यथा एकाही पुढा-याला गावात प्रवेश दिला जाणार नाही. जो पर्यंत सगेसोयरे अद्यादेश पारीत होत नाही तो पर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटायच नाही. असे निर्णय घेत प्रत्येक गावातून लोकवर्गणी करून दोन ते तीन उमेदवारी अर्ज परभणी लोकसभेला भरणार असल्याचा ठराव ही या वेळी पारित करण्यात आला. या सोबतच मनोज जरांगे पाटील हे १० मार्च रविवार रोजी सायंकाळी सात वाजता मानवत येथे सकल मराठा समाजाची बैठक घेण्यासाठी येत आहेत या बैठकीला  पाथरी शहरा सह गावागावातील मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणुक अर्जा साठी लागणारे नियोजन प्रत्येक जि प,पं स गट आणि गणात केले जाणार आहे. लोकसभेला उमेदवारी अर्ज भरण्या साठी मराठा समाजाती वकील मंडळी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे या वेळी सागण्यात आले. या बैठकी साठी मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी उपस्थित होती. शेवटी आरक्षणाच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि राष्ट्रगिताने या सकल मराठा समाजाच्या बैठकीची सांगता करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या