🌟परभणी येथील सकल मातंग समाजाच्या वतीने उद्या रविवार दि.२४ मार्च रोजी हॉटेल अतिथीत बैठकीचे आयोजन.....!


🌟कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही त्यामुळे मातंग समजामध्ये संतापाची लाट🌟

परभणी (दि.२३ मार्च) : परभणी येथील स्टेडियम परिसरातील हॉटेल अतिथीत उद्या रविवार दि.२४ मार्च रोजी सकाळी ११-०० वाजता सकल मातंग समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

          कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मातंग समजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या संतापाला वाट करून देण्यासाठी प्रत्येक लोकसभेला मातंग उमेदवार उभे करून शक्ती निर्माण करण्यात येणार आहे. मातंग समाजाच्या अस्मितेसाठी व स्वाभिमानी राजकारणासाठी परभणी लोकसभा उमेदवार निश्‍चित करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला सकल मातंग समाजाने उपस्थित राहावे, असे अवाहन  करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या