🌟वाशिम येथील श्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला उपशिक्षणाधिकारी....!


🌟श्री बाकलीवाल विद्यालयाच्या होतकरू विद्यार्थ्यांने शाळेचे केले नावलौकीक : शाळा समितीच्या वतीने सत्कार🌟

फुलचंद भगत

वाशिम - येथील श्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी धिरज सखाराम पतंग याने २०२२ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेतून दैदिप्यमान यश मिळवून उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. यापुर्वी धिरजने मंत्रालय लिपीक, कर सहाय्यक, तलाठी तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधक श्रेणी १ मुद्रांक निरिक्षक म्हणूनही चांगल्या गुणांनी परिक्षा उत्तीर्ण केली होती. धिरज हा स्थानिक शुक्रवारपेठ भागातील रहिवासी आहे. त्याने श्री बाकलीवाल विद्यालयातून मराठी माध्यमातून इयत्ता १० वी पर्यतचे शिक्षण घेतले होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्याने मिळविलेल्या या नेत्रदिपक यशाबद्दल श्री बाकलीवाल शाळा समितीच्या वतीने धिरज पतंगे याचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक सुनिल दंभिवाल आदींनी धिरजचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. घरची परिस्थिती अत्यंत साधारण असतांनाही धिरजने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या