🌟क्षमता वृद्धी प्रशिक्षणातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार : दर्जेदार प्रशिक्षणातून गुणवत्ता वृद्धिंगत....!


(सेलू: शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात प्रशिक्षण समन्वयक सुनीता काळे,अनुजा सुभेदार,सिद्धार्थ एडके,रवींद्र कदम,एस.पी.कदम,आय बी घोडके,धनंजय भागवत आदी)

🌟सेलू येथे इयत्ता 9 ते 12 ला शिकवणाऱ्या शिक्षकांचे सध्या प्रशिक्षण सुरू🌟

सेलू (दि.05 फेब्रुवारी) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या संस्थेमार्फत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू येथे इयत्ता 9 ते 12 ला शिकवणाऱ्या शिक्षकांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे.या प्रशिक्षणातून शिक्षकांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार तर आहेतच पण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि येणाऱ्या नवीन बदलाला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होणार आहे.

या प्रशिक्षणातून अध्ययन निष्पत्ती,एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास,जिज्ञासू वृत्ती वाढवणे,तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थी कसे घडवावेत यासाठी या प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जात आहे.यामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा,आंतरसमवाय क्षेत्रे,नाविन्यपूर्ण अध्यापन,व्यवसाय मार्गदर्शन,यासह इतर अनेक विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जात आहे.येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा लक्षात घेऊन कुमारावस्थेतील मुले समजून घेऊन त्यांना अध्यापन करणे,शाळा व क्षमता आधारित मूल्यांकन,कृती संशोधन व नवोपक्रम,प्रभावी शैक्षणिक नेतृत्व या विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे.येणाऱ्या काळात बदलत्या शैक्षणीक धोरणातील बाबी शिक्षकांना माहीत व्हाव्यात,आपल्या अध्यापनात कृतीशीलता आणि नावीन्यपूर्णता आणण्यासाठी हे प्रशिक्षण प्रभावी ठरणार आहे.

या प्रशिक्षणात शिक्षकांना भोजन व्यवस्थाही उत्तम केलेली आहे.तसेच मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध केली आहे.गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी प्रशिक्षणाबाबत भेटी देऊन मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणासाठी सिद्धार्थ एडके,आय बी घोडके,रवींद्र कदम,एस.पी.कदम,ए.ए.सुभेदार आदी जण शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत तर सुनीता काळे,मुख्याध्यापक भुजंग थोर,अंजली पद्माकर,अश्विनी आम्ले,जनार्दन कदम,अरुण राऊत,रामेश्वर मरेवार, मनीषा पारधी आदी परिश्रम घेत आहेत...

_______________________________________________

☀️शिक्षकांना निश्चित फायदा - गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत

- सदरील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना निश्चितच विद्यार्थ्यांना अध्यापन करतांना याचा फायदा होणार आहे.यातील विविध कौशल्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होणार असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या