🌟नवीन पोलीस मुख्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. आहे.....!


🌟शिबिरात ८०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी/अंमलदार व कुटुंबीयांनी घेतला लाभ🌟


फुलचंद भगत

वाशिम:-वाशिम पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदरुस्तीसाठी वाशिम जिल्हा पोलीस दल मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनविन उपक्रमांचे आयोजन करत असते. तसेच कल्याण शाखेमार्फत अनेक आरोग्य कार्यशाळा व तपासणी शिबिरांचे आयोजन करून त्याचा लाभ पोलीस अधिकारी/अंमलदार व कुटुंबियांना मिळवून दिला जातो.


याच पार्श्वभूमीवर नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी श्रीमती डॉ.पूर्वा अनुज तारे यांच्या संकल्पनेतून व मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या विशेष पुढाकार व मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिरामध्ये वाशिम जिल्ह्यातील अनुभवी व तज्ञ वैद्यकीय अधिकारी ज्यामध्ये स्त्री-रोग तज्ञ  डॉ.आरती डोईफोडे, डॉ.लीना राठोड, डॉ.सरोज बाहेती, डॉ.शुभांगी साबू, डॉ.संगीता सारडा, डॉ.नीलिमा गुघाने, डॉ.भाग्यश्री जोशी, बालरोग तज्ञ डॉ.हरीश बाहेती, डॉ.संतोष भट्टड, डॉ.राम बाजड, डॉ.नितीन ढोबळे, डॉ.किरण बगाडे, डॉ.राहुल ईढोळे, डॉ.अविनाश दहात्रे, पॅथोलॉजी तज्ञ डॉ.स्वाती साबू, डॉ.अनुराधा दागडिया, डॉ.नारायण डाळे, डॉ.सुजाता जाजू, अस्थिरोग तज्ञ डॉ.श्याम काटेकर, डॉ.सागर ठाकूर, डॉ.सचिन कड, डॉ.प्रदीप पाठक, डॉ.प्रकाश बागडे, दंतरोग तज्ञ डॉ.स्वाती तोष्णीवाल, डॉ.सुखबीर सिंग ओबेराय, डॉ.वैशाली कड, डॉ.श्रुती काटेकर, डॉ.गुरुप्रीतसिंग सेठी, डॉ.रविंदरकौर सेठी, डॉ.रश्मी मुंदडा, डॉ.चेतन अग्रवाल, डॉ.माधुरी शिंदे, डॉ.हर्षली जाधव, कान-नाक-घसा तज्ञ डॉ.संतोष बेदरकर, नेत्ररोगतज्ञ डॉ.स्मिता पावसे, मानसोपचार तज्ञ डॉ.श्वेता ठाकूर, वैद्यकशास्त्र तज्ञ डॉ.सचिन खोलगडे, डॉ.सागर दागडिया, त्वचारोग तज्ञ डॉ.सौरभ सारडा अशा एकूण ३५ तज्ञ डॉक्टर व ५० हून अधिक स्टाफ नर्स यांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यातील ८०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी/अंमलदार व कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली. यावेळी आवश्यकतेनुसार औषधांचे वितरण करण्यात आले.

सदर वैद्यकीय शिबिरात मा.जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. (भा.प्र.से.) आणि वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वैभव वाघमारे (भा.प्र.से.) यांनी विशेष उपस्थिती दर्शवून आपली आरोग्य तपासणी केली. सदरचे वैद्यकीय तपासणी शिबीर श्रीमती डॉ.पूर्वा अनुज तारे यांच्या संकल्पनेतून व मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेऊन पार पाडले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या