🌟परभणी लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह असलेला उमेदवार देण्यात यावा....!


🌟माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले पत्र🌟

परभणी (दि.26 मार्च) :  परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह असलेला अधिकृत उमेदवार देण्यात यावा अन्यथा आपण ही जागा गमावू असे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.  

        परभणी लोकसभेतील 2 हजार 250 बुथवर भाजपाला नेले आहे. गेल्या 6 लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा खासदार परभणीत आहे, गेल्या दोन वेळा मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवाराला त्याठिकाणी सर्वांनी काम करून निवडून दिले. विधान परिषद निवडणुकीत ही बाजोरीया हे अकोल्याचे असूनही आम्ही त्यांची उमेदवारी स्विकारून त्यांना निवडून दिले, असे नमूद करीत लोणीकर यांनी  परभणी लोकसभेत सध्या भाजपाचे 3 आमदार आहेत, 17 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, 65 पंचायत समितीचे सदस्य आहेत तर 92 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत. मग इतके काम करूनही आता खर्‍या अर्थान भाजपाला संधी आली आहे की परभणी लोकसभेत भाजपाने आपला स्वतःचा उमेदवार द्यावा, असे म्हटले.

         काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा ही जागा लढवली मात्र त्यांना या ठिकाणी कधीच यश आले नाही. प्रत्येक वेळी युतीचा लादलेला उमेदवार आम्ही निवडून दिला. मात्र आता परभणी लोकसभा मतदारसंघातील कमळ चिन्ह असलेला उमेदवार द्यावा, अन्यथा आपण ही जागा गमावणार हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असल्याचे लोणीकर यांनी म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या