🌟नांदेड शहरातील अनेक भागात सायंकाळच्या सुमारास जाणवले भुकंपाचे सौम्य धक्के : नागरीकांमध्ये भितीचे वातावरण.....!


🌟सदर धक्क्याची नोंद १.५ रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगण्यात आली🌟

नांदेड : नांदेड महानगर पालिका हद्दीतील शिवाजी नगर आयटीआय परिसर विवेक नगर कैलास नगर श्रीनगर पोलीस कॉलनी आदी परिसरामध्ये आज रविवार दि.०३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०६.१८ वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले यावेळी अनेक घरांना हादरे बसल्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः भयभीत होऊन घराबाहेर आल्याचे देखील पाहावयास मिळाले.

भुकंपाचे धक्के सौम्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हाणी झाली नसल्याचे समजते या भुकंपा संदर्भात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावर उपलब्ध माहितीनुसार सदर धक्क्याची नोंद १.५ रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या