🌟भारतीय सुरक्षा दिवस सप्ताह : सुरक्षा दलांना माझे मनस्वी अभिवादन.....!


🌟राष्ट्रीय सुरक्षा दिवस अर्थात नॅशनल सेफ्टी डे भारतात प्रत्येक वर्षी ४ मार्च रोजी पाळला जातो🌟

राष्ट्रीय सुरक्षादिन सप्ताह हा त्या सर्व बलिदान करणार्‍यांना समर्पित आहे, ज्यांनी आपले रक्त सांडून देशाचे रक्षण केले. या दिवशी भारत देश त्यांच्या धैर्य आणि उत्कटतेला सलाम करतो. आपल्या हृदयात स्थान असणार्‍या अशा शहिदांच्या बलिदानाला कोणी शब्दात कसे काय मांडू शकेल? देशापुढील अनेक समस्या आणि विषयांवर राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने कार्य केले पाहिजे. जेणेकरून देशात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकेल. नारी सुरक्षा याबद्दल सर्वांनी मिळून कार्य करणे आवश्यक आहे. श्री के.जी.निकोडे- केजीएन यांच्या लेखणीतून जाणून घ्या ज्ञानवर्धक माहिती... संपादक.

     राष्ट्रीय सुरक्षा दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट सुरक्षिततेसह आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित विविध हालचालींविषयी लोकांना जागरूक करणे आहे. हा उत्सव साजरा करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे सुरक्षिततेसाठी विविध औद्योगिक क्षेत्रात लोक सहभागास प्रोत्साहित करणे. वेगवेगळ्या व्यवसाय मालकांद्वारे त्यांच्या कर्मचार्‍यांना विविध सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये गुंतवून सहभागी करून घेण्याच्या दृष्टिकोनास प्रोत्साहित करणे. या मोहिमेद्वारे गरजांवर आधारित क्रियाकलाप, कायदेशीर आवश्यकतांसह आत्मपरीक्षण आणि कामाच्या ठिकाणी अधिकृत आरोग्य सुरक्षा आणि वातावरणाशी संबंधित क्रियाकलापांना पार पाडणे. मालक आणि कर्मचार्‍यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदारीची आठवण करून देऊन कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सावधगिरीच्या प्रवृत्तीसह सुरक्षिततेस प्रोत्साहित करणे. आदी पैलूही सांगता येतील.

     राष्ट्रीय सुरक्षा दिवस अर्थात नॅशनल सेफ्टी डे भारतात प्रत्येक वर्षी ४ मार्च रोजी पाळला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या जीवनातील विविध वेळी जागरूक नसल्याने किंवा लक्ष न दिल्यामुळे होणारे अपघात रोखणे, हे आहे. सद्या आईबापच आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहने सुपूर्द करताना दिसतात. त्यामुळे अल्पवयीनांसह इतरांच्याही अपघाती मृत्यूच्या प्रमाणात भरमसाठ वाढ झालेली दिसते. पूर्वी साजरा केलेला राष्ट्रीय सुरक्षा दिन आता राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या आठवड्यात विविध जागरूकता कार्यक्रमांद्वारे औद्योगिक अपघात टाळण्याच्या पर्यायांवर लोकांना जागरूक केले जाते. या संपूर्ण आठवड्यात केल्या गेलेल्या प्रत्येक कार्याचा एकमात्र उद्देश म्हणजे लोकांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे आणि त्यांना संरक्षणाच्या विविध मार्गांबद्दल जागरूक करणे होय. हा दिवस प्रथमच दि.४ मार्च १९६६ रोजी साजरा करण्यात आला. ज्यामध्ये आठ हजार सदस्यांनी हजेरी लावली होती, त्यावेळी हा दिवस देशातील लोकांना सुरक्षिततेच्या दिशेने जागृत करण्याच्या उद्देशाने साजरा करणात आला होता. त्यात देशात व समाजात कशा प्रकारे एकमेकांची सुरक्षा लक्षात घेता कार्य करावे, त्या दिशेने प्रवृत्त केले गेले.

     राष्ट्रीय सुरक्षा दिन हा देशाच्या सुरक्षा विभागास आणि देशाला सुरक्षा देणारे सर्व सैनिक यांच्यासाठी विशेष रूपाने साजरा केला जातो. या सर्वांमुळे देशाच्या सीमांचे रक्षण होते, या कारणास्तव देशात शांतता आणि सुरक्षेची भावना निर्माण होते. या दिवशी आपण सर्व देशवासी या सर्व सुरक्षा दलांना मनापासून अभिवादन करतो. हा दिवस अस्तित्वात आणण्याचा उपक्रम नॅशनल सेफ्टी कौन्सिल तर्फेच करण्यात आला. ४ मार्च रोजी भारतात नॅशनल सेफ्टी कौन्सिलची स्थापना झाली, म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल सेफ्टी कौन्सिल ही एक स्वायत्त संस्था आहे, जी सार्वजनिक सेवेसाठी अशासकीय आणि नफा न घेणार्‍या संस्थेच्या रूपात काम करते. या संघटनेची स्थापना इ.स.१९६६मध्ये मुंबई सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत करण्यात आली होती, ज्यात आठ हजार सदस्य होते. यानंतर इ.स.१९७२मध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लवकरच हे राष्ट्रीय सुरक्षा दिनाऐवजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. 

     राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी, ताकदीचे प्रक्षेपण व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जातात. ही बाब प्रथमतः दुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली. तसेच ती राखण्यास आर्थिक सुरक्षा, उर्जा सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा, सैन्याची ताकद व सायबर साचा सुरक्षा याही बाबी महत्त्वाच्या समजल्या जातात. व्याख्या- प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था करते या व्यवस्थेला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात.

     राष्ट्रीय सुरक्षा दिन उद्दिष्टे- स्वच्छता: देशाचे संरक्षण केवळ शत्रूपासून संरक्षण नव्हे तर आजारांपासून लोकांना सुरक्षित ठेवणे देखील आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस प्रत्येकाला या दिशेने पाऊल टाकण्याचा मार्ग दर्शवितो. देश स्वच्छ ठेवणे देखील सुरक्षेच्या अंतर्गत येते. ज्यामध्ये सरकार आणि जनता तसेच उद्योगपती जबाबदार आहेत आणि या सर्वांनी एकत्रितपणे देशात स्वच्छता संबंधित सुरक्षा आणणे आवश्यक आहे, अशाप्रकारे स्वच्छता देखील सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट आहे. अन्न: आजच्या काळात भेसळयुक्त वस्तूंचे प्राबल्य अधिक आहे, यामुळे बर्‍याच रोगांनाही कारणीभूत ठरत आहे आणि ही नवीन जनरेशन यामुळे कमकुवत होत आहे. देशाचे अधिक संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. हाच सुरक्षेचा देखील एक भाग आहे.  गरिबी दुरिकरण: देशातील गरिबांची संख्याही खुपच आहे. त्यामुळे ते असुरक्षित आहेत. त्यांच्यासाठीही विचार करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गरिबांवर भुकमरीची वेळ येऊ नये व त्यांना जगण्यासाठी काही साधन मिळू शकेल, याची काळजीही घेतली गेली पाहिजे. हासुद्धा सुरक्षेचा एक भाग आहे.

     राष्ट्रीय सुरक्षादिन सप्ताह हा त्या सर्व बलिदान करणार्‍यांना समर्पित आहे, ज्यांनी आपले रक्त सांडून देशाचे रक्षण केले. या दिवशी भारत देश त्यांच्या धैर्य आणि उत्कटतेला सलाम करतो. आपल्या हृदयात स्थान असणार्‍या अशा शहिदांच्या बलिदानाला कोणी शब्दात कसे काय मांडू शकेल? देशापुढील अनेक समस्या आणि विषयांवर राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने कार्य केले पाहिजे. जेणेकरून देशात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकेल. नारी सुरक्षा याबद्दल सर्वांनी मिळून कार्य करणे आवश्यक आहे. मुलींना मुक्केबाजी, कराटे यांसारखे स्वतःचे रक्षण स्वतः करू शकेल, असे शारीरिक बलवर्धक प्रशिक्षण दिले पाहिजे. एखादी घटना घडल्यानंतर शिक्षा देणे न्यायालयाचे काम आहे. परंतु या घटनांचा अंत करण्यासाठी आपण सर्वांनी विचार करणे व कार्य करणे आवश्यक आहे. तरच राष्ट्रीय सुरक्षा दिवस प्रभावी सिद्ध होईल.

!! राष्ट्रीय सुरक्षादिन सप्ताहाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

श्री के. जी. निकोडे- केजीएन.

                       मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.

                       ता. आरमोरी, जि. गडचिरोली. 

                       भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.

                     

                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या