🌟हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे शेळी चोर पुन्हा सक्रिय : चोरट्यांनी चार शेळ्या पळवल्या.....!


🌟दरम्यान शहरात शेळी चोर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे🌟

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात राहून राहून शेळ्या चोरण्याचे प्रकार घडत असतात काल शुक्रवार दि.१५ मार्च २०२४ रोजी सुद्धा असाच प्रकार घडला शहरातील मोंढा परिसरात मोकळ्या चरणाऱ्या शेळ्या वर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला असल्याचे निदर्शनास आले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की सिराज कॉलनी भागातील प्रत्येक घरात शेळ्या आहेत त्या मोंढा भागात फिरत असतात पण काल शुक्रवारी एका पत्रकाराच्या घराच्या मोकळ्या फिरणाऱ्या चार शेळ्या दुपारी १२-०० वाजे पर्यंत फिरत होत्या पण दुपार नंतर त्या शेळ्या गायब झाल्यामुळे शेळी पालकांनी शोधाशोध सुरू केली पण त्या काही मिळून आल्या नाही.

या शेळ्यांचा संध्याकाळ पर्यंत काही थांग पत्ता लागला नसल्याने समजते दरम्यान या चार शेळ्यांची अंदाजे किंमत पन्नास ते साठ हजार रुपये असल्याने संबंधित शेळी पालकांचे पन्नास ते साठ हजार रुपये नुकसान झाल्याचे कळत आहे दरम्यान शहरात शेळी चोर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या