🌟पुर्णा तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार कृष्णाजी मस्के यांच्या अध्यक्षतेखाली 'जागतिक ग्राहक दिन' साजरा.....!


🌟यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची कार्यकारणी जाहीर करण्यात आली🌟 

पुर्णा (दि.१९ मार्च) :- पुर्णा येथील तहसिल कार्यालयात आज मंगळवार दि.१९ मार्च रोजी नायब तहसीलदार कृष्णाजी मस्के यांच्या अध्यक्षतेखाली 'जागतिक ग्राहक दिन' उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे परभणी जिल्हा संघटक धाराजी भुसारे,परभणी जिल्हा सुवर्ण महोत्सव समन्वयक मंचकराव बचाटे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष जनार्दन आवरगड,तालुका अध्यक्ष राधाताई दुधाटे,पुर्णा शहराध्यक्ष सय्यद सलीम सुहागनकर,पुर्णा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष संभाजी मोरे,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजय ठाकूर,पुर्णा गॅस एजन्सीचे आहेर यांच्यासह शिक्षक,ग्रामसेवक,तलाठी इत्यादींची आवर्जून उपस्थिती होती.

या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर अजय ठाकूर यांनी औषधी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती ग्राहकांना दिली त्यांनी यावेळी बोलतांना असे नमूद केले की डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधी त्याच कंपनीच्या असाव्या एक्सपायरी डेटची औषधी ग्राहकांनी खरेदी करु नयें गोळ्या औषधी खरेदी केल्यानंतर औषध विक्रेते अर्थात मेडिकलवर चालकाला पावतीची मागणी करावी पावती वरचे पैसे आणि दिलेले पैसे जुळतात का हे पाहावे अशा प्रकारचे महत्त्वाचे बाबी ग्राहकांना समजतील अशा पद्धतीत त्यांनी सांगीतल्या यावेळी धाराजी भुसारे यांनी आपण पाण्याची बाटली घेतो क्या बाटली संदर्भात आयएसआय मार्क आहे का त्याची एमआरपी किंमत किती आहे ही बाटली किती रुपयाला विकली जाते जी बाटली १५ रुपयांची आहे तीच पाण्याची बॉटल २० ते २५ रुपयात विकली जाते त्यावेळेस ग्राहकाची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते असे त्यांनी ग्राहकांना मार्गदर्शन केले. 

🌟अखिल भारतीय ग्राहक पंचायतची कार्यकारणी जाहीर :-

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक धाराजी भुसारे जिल्हा सुवर्ण महोत्सव समन्वयक मंचकराव बचाटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष  जनार्धन आवरगंड तालुका समन्वयक सुदर्शन अंभोरे महिला तालुका अध्यक्ष राधाताई दुधाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवार दि.१९ मार्च रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात तालुका संघटक शिवाजी कोंडीबा शिराळे,सहसंघटक शेख मसूद शेख महमूद,उपाध्यक्ष मुंजाजी सुभाष भोसले लक्ष्मण शंकरराव शिंदे सचिव गोविंद पांडुरंग मोरे कोषाध्यक्ष भगवान रामकिशन दुधाटे,प्रसिद्धी प्रमुख सचिन सोनकांबळे,महिला तालुका उपाध्यक्ष कविता लक्ष्मण शिंदे,संघटक स्वाती गजानन सुरवसे तर शहर उपाध्यक्ष पदावर किशोर भीमराव सूर्यवंशी,नारायण सोनटक्के,संघटक सुशीला शिवाजीराव गायकवाड,सचिव संतोष दत्तराव कऱ्हाळे,कोषाध्यक्ष संजय घनश्याम पांचाळ,महिला शहराध्यक्ष मधुरा मारुती गरड,उपाध्यक्ष सुनीता गौतम सोनवणे,संघटक मंगल रामा पांचाळ,सचिव भारती केशव खंदारे आदींची निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यकारणी सदस्य मधुकर मुळे यांची सुद्धा उपस्थिती होती यावेळी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर प्रस्ताविक जनार्धन आवरगंड यांनी तर आभार प्रदर्शन सुनिता सोनवणे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या