🌟नांदेड-पुणे विमान सेवा २३ मार्च पासुन सुरू होणार....!


🌟विमान सेवा नियमित सुरु राहावी यासाठी प्रसार माध्यमांनी आपली लेखणी याकडे वळवावी - पंढरीनाथ बोकारे 


नांदेड (दि.०९ मार्च) - दिल्ली-चंडीगड-अमृतसर-मुंबई-हैदराबाद-नांदेड अशी सेवा अपेक्षित आहे.. नांदेड-पुणे ची मागणी नसताना हि सेवा सुरु होत आहे तरी पण नसल्यापेक्षा छान,स्टार एअर सेवेचे स्वागत आहे. .. पंजाब दिल्ली हून नांदेड ला येण्यासाठी दिल्ली-पुणे आणि पुणे-नांदेड असा सहप्रवास करावा लागेल जर पुणे येथून विमान सेवा सुरु झाल्यास. नांदेड चा गुरुद्वारा देश विदेशात प्रसिद्ध असल्याने विमानाला पुरेसे प्रवासी नियमित उपलब्ध होऊ शकतात. विमान सेवा सुरु राहिल्यास नांदेडचे नाव जगभर होत राहिल,आर्थिक उलाढाल पण वाढत राहिल.. अनेकांना रोजगार मिळेल.. दिल्ली-अमृतसर-मुंबई अशी विमान सेवा नांदेडच्या फायद्याची असणार आहे.. 


नांदेडची विमान सेवा नियमित सुरु राहावी यासाठी प्रसार माध्यमांनी आपली लेखणी याकडे वळवावी असे आवाहन नांदेड येथील नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या