🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप🌟

* हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाने घेतला  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

* सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधानपदावर पाणी सोडणार का? संजय राऊतांचा सवाल

* खासदार प्रतापराव जाधव यांची 15 वर्षाची खासदारकीची कारकीर्द  ही निष्क्रीय असल्याने व त्यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केल्याने खा‌.जाधव यांच्यासहित रविकांत तुपकर व कुठल्याच उमेदवाराचे माझ्यापुढे आव्हान नाही त्यामुळे मी मोठ्या मताधिक्याने  विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रा नरेंद्र खेडेकर यांनी चिखलीत  पत्रकारांशी बोलताना केला दावा

* एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर बुलढाण्यातुन पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी

* कोल्हापूरचा पेच अखेर सुटला ; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर

* महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटेना,आज पुन्हा बैठक

* संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

* शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे संभ्रम

* प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात मविआचे जोरदार शक्तिप्रदर्शन; तब्बल 25 वर्षानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार

* काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या ट्विटने सांगली  जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ, निवडणूक लढवण्याचे दिले संकेत

* जयंत पाटील म्हणाले,चांगला नट तरी घ्यायचा,मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट.

* नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश,लोकसभा उमेदवारीही मिळाली,माजी खासदार अडसूळ संतापले

* बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहभागा शिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही ; संजय राऊत

* भाजपमध्ये जायची वेळ आली तर  सुनील तटकरे सर्वात पहिली उडी मारतील ; रोहित पवारांचा हल्लाबोल

* मंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत,रुग्णालयात दाखल,उपचार सुरु,प्रकृती स्थिर

* मिरजेतून कत्तलीला नेणाऱ्या दोन खिल्लार बैलांची सुटका, कर्नाटक राज्यातील दोघांना अटक

* स्वबळावर पुन्हा मोदी सरकार येणार - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

* पंकजा मुंडे अंबाजोगाई दौऱ्यावर,योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन दौऱ्यास सुरूवात

* भिडायचं असेल तर माझ्याशी भीड,मी लोकसभेला उभी आहे, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांना दिले सडेतोड उत्तर

* यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची दाहकता अधिक राहणार असल्याची शक्यता; जळगाव जिल्ह्यातील सर्वच शहरातील तापमान 42 अंशाच्या वर

*बॉलिवूड अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश ; उत्तर पश्चिम मु्ंबईतून गोविंदा यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता

* भारताचं नवं फायटर जेट तेजस एमके १ए Mk1Aचं आज यशस्वी उड्डाण; या फायटर जेटची डिलिव्हरी मार्च 2024 ते फेब्रुवारी 2028 च्या दरम्यान होणार

* कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 1 एप्रिलपर्यंत सुनावली ईडी कोठडी; त्यामुळे केजरीवाल यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार*

* महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दाते यांची NIA च्या महासंचालकपदी नियुक्ती

* महायुतीमध्ये आम्ही नाराज,पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

* सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नक्कीच एखादा चित्रपट काढूया;  महेश मांजरेकरांच रोखठोक वक्तव्य

* साताऱ्यात उदयनराजे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन ; कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढविणार

* दररोज 350 युनिट्सची वीज निर्मिती, आदित्य ब्रिझ पार्कचा नवा आदर्श

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या