🌟परभणी जिल्ह्यातील पालम तालक्यातल्या फरकंडा येथील डिग्रस बंधाराग्रस्त शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देणार....!


🌟शिवसेना संपर्कप्रमुख माजी खासदार सुरेश जाधव यांचे आश्वासन🌟 

परभणी : परभणी जिल्ह्यातील पालम तालक्यातल्या फरकंडा येथील डिग्रस बंधाऱ्याच्या बुडित क्षेत्राच्या मावेजापासून अद्याप पर्यंत अनेक बंधाराग्रस्त शेतकरी वंचित आहेत या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मावेजा मिळालेला नाही आपल्या हक्काच्या मावेज्यापासून अनेक बंधाराग्रस्त शेतकरी वंचित असल्याने अशा उर्वरीत शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी फरकंडा येथील शेतकरी प्रसाद पौळ यांनी माजी खासदार सुरेश जाधव यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.

फरकंडा येथील उर्वरित शेतकरी मावेजाच्या प्रतिक्षेत आहेत. अशा शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळून देऊ असे अश्वासन माजी खा.तथा शिवसेना संपर्कप्रमुख सुरेशराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यांच्या मागण्याकडे विशेष लक्ष देऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे हा प्रश्न पुन्हा उपस्थित करून लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी रूरल एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या