🌟पुर्णेतील सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲड.धम्मदीप जोंधळे यांची भारत सरकार नोटरी पदी निवड...!


🌟त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟 

पुर्णा (दि.१५ मार्च) - पुर्णा येथील आंबेडकरी व धम्म चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व पूर्णा नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक ऍड धम्मदीप जोंधळे यांची निवड भारत सरकार नोटरी पदी ऑनलाइन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून झाली काल गुरुवार दि.१४ मार्च २०२४ रोजी ला त्यांना तशा प्रकारचे नियुक्तीपत्र देण्यात आले.


परभणी येथील छत्रपती शिवाजी विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबी ची पदवी प्राविण्‍यामध्ये उत्तीर्ण केली व बालपणापासून वकील बनण्याचं स्वप्न पूर्ण केले तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत मित्र मंडळ मध्ये अध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले सामाजिक राजकीय आंबेडकरी व परिवर्तन प्रबोधन चळवळीमध्ये पूर्ण शहरांमध्ये त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे प्रखर स्वाभिमानी बाणा निर्भिड आणि स्पष्ट वक्ते पणा लोकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभागी होण्याचा स्वभाव यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले भारिप बहुजन महासंघ व आता वंचित बहुजन आघाडी यामध्ये श्रद्धेय आदरणीय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे.

त्यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत रिपाई नेते प्रकाश कांबळे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे ज्येष्ठ नगरसेवक अनिल खरगखरा टे ज्येष्ठ समाजसेवक देवराव दादा खंदारे दिलीपराव हनुमंते  दादाराव पांडित नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड मुकुंद भोळे अशोकराव धबाले यादवराव भवरे कामगार नेते अशोक व्ही कांबळे प्राचार्य डॉ.केशव जोंधळे प्राचार्य राम धबाले विजय जोंधळे जेस्ट पत्रकार विजय बगाटे जगदीश जोगदंड दिनेश चौधरी मोहन लोखंडे कैलाशकुमार बलखंडे  अनिल अहिरे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे बाबाराव वाघमारे श्रीकांत हिवाळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस बौद्धाचार्य तुकाराम ढगे कोषाध्यक्ष गौतम वाघमारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड इंजिनिअर पी.जी.रणवीर ऍड जितेंद्र सोनसळे तथागत मित्र मंडळाचे मनोज खिल्लारे धम्मा खंदारे प्रवीण कनकुटे शिवा हातागळे विशाल भुजबळ   त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले भावी कार्यास शुभेच्छा दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या