🌟परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी : राजेश विटेकरांनी केले पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाचे स्वागत...!


🌟मागील लोकसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी राजेश विटेकर निवडणूक हारले होते🌟 


परभणी (दि.३० मार्च) : परभणी लोकसभा मतदारसंघातून मागील २०१९ घ्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून अल्पशा मतांनी निवडणूक हारलेले परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे इच्छूक उमेदवार राजेश विटेकर यांनी मोठ्या मनाने पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीतून राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी बहाल करण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे.

           राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून जानकर यांची परभणीतून उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर दैनिक दिलासाशी बोलतांना विटेकर यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे स्वागत केले. पक्षाचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यासह श्रेष्ठींनी घेतला निर्णयाचे आपण मनःपूर्वक स्वागत करत आहोत, आपण जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहु व महायुतीच्या माध्यमातून जानकर यांना या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणू, असा विश्‍वासही विटेकर यांनी व्यक्त केला. श्रेष्ठींचा हा निर्णय, आदेश हा शिरसावंद्य मानत आहेत, कोणतीही नाराजी नाही किंवा खंतही नाही. आपण इनामे इतबारे पक्षाकरीता काम करीत आलो आहोत. तर भविष्यातसुध्दा प्रामाणिकपणेच श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे काम करत राहू, अशी ग्वाहीही विटेकर यांनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या