🌟मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील संस्कार गुरुदेव महिलामंडळाची होळीनिमित्य दहिहांडी....!


🌟गजानन महाराज मंदिर परिसरातील सापसफाई करुन महिलांनी राबविले सामाजिक ऊपक्रम🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील संस्कार गुरुदेव मंडळातील महिलांनी होळीनिमित्य श्री.गजानन महाराज मंदीर परिसरातील साफसफाई मोहिम राबवुन दहिहांडीचा कार्यक्रम आयोजीत केला होता.ऊत्साहाचे प्रतिक म्हणून एकमेकिंना रंग लावुन आपला आनंद व्यक्त केला.


     सामाजीक कार्याची परंपरा कायम ठेवत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील संस्कार गुरुदेव मंडळातील महिलांनी एकञीत येवुन गजानन महाराज मंदिर परिसरातील साफसफाई केली.स्वच्छतेतुन समृध्दी हा मुलमंञ जपत ही स्वच्छता मोहिम होळीच्या पर्वावर आयोजीत केली होती.तसेच महिलांनी दहिहांडी फोडुन एकमेकींना प्रसाद वाटला सोबतच सुख ऊत्साहाचे प्रतिक म्हणून एकमेकींना रंग लावुन आपला आनंदही व्यक्त केला.यापुढेही असेच नवनविन प्रेरणादायी व समाजपयोगी ऊपक्रम राबवणार असल्याचे मत या मंडळातील पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिलांसोबतच बालगोपालांचीही ऊपस्थीती होती.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या